हवाई दलाच्या सी-17 ने केले आजपर्यंतचे सर्वात लांब पल्ल्याचे उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 10:51 PM2018-08-30T22:51:25+5:302018-08-30T22:52:35+5:30
11 तासांचे हे विनाथांबा उड्डाण चेन्नईहून ऑस्ट्रेलियाला करण्यात आले. चेन्नईमध्ये सूर्योदयापूर्वी सी-17 ग्लोबमास्टरने उड्डाण केले आणि ऑस्ट्रेलियाला सुर्यास्तापूर्वी पोहोचले.
चेन्नई : भारतीय हवाई दलाच्या सी-17 ग्लोबमास्टर या सर्वात मोठ्या मालवाहू विमानाने आज सर्वाधिक लांब पल्ल्याचे उड्डाण केले. 11 तासांचे हे विनाथांबा उड्डाण चेन्नईहून ऑस्ट्रेलियाला करण्यात आले. चेन्नईमध्ये सूर्योदयापूर्वी सी-17 ग्लोबमास्टरने उड्डाण केले आणि ऑस्ट्रेलियाला सुर्यास्तापूर्वी पोहोचले.
सी-17 हे विमान एकावेळी 75 टन सामान घेऊन जाऊ शकते. या विमानाचे वजन 128 टन आहे. परंतू हे विमान आरामात कोणत्याही अद्ययावत धावपट्टीवर उतरू शकते. आंतरराष्ट्रीय सिमांच्या जवळील धावपटट्यांना अॅडव्हांस्ड लँडिंग ग्राउंड म्हटले जाते.
Longest flight by C-17 of #IAF : On 16 Aug 18, C-17 Globe Master of IAF, undertook 11 hours non-stop flight from Chennai to Townsville, East Coast Australia. This feat was achieved during the de-induction of the IAF #PitchBlack contingent 2018.https://t.co/Mlh0nueIIZpic.twitter.com/k0fkZ1XPj8
— Indian Air Force (@IAF_MCC) August 30, 2018
भारतीय हवाई दलाकडे असलेले हे सर्वात मोठे विमान आहे. तसेच हे विमान आपल्या ताफ्यात असणार भारत जगातील दुसरा मोठा देश आहे. या विमानात 102 पॅराट्रुपर्स, टँक आणि सेनेच्या वाहनांना वाहून नेण्याची क्षमता आहे. या विमानाचा वापर हवाई दलाकडून अनेक कारवायांमध्ये केला गेला आहे.
अमेरिकेची बोईंग ही कंपनी सी-17 ग्लोबमास्टर हे विमान बनविते. या कंपनीने आतापर्यंत 255 विमाने बनविली आहेत. यापैकी 222 सी-17 ग्लोबमास्टर एकट्या अमेरिकेकडे आहेत. भारताने अशी 10 विमाने खरेदी करण्याचे कंत्राट दिले आहे. एका विमानाची साडे पाच अब्ज डॉलर एवढी किंमत आहे. भारताकडे या विमानाशिवाय रशियामध्ये बनलेले आयएल-76 हे मालवाहू विमान आहे. ते 40 टन सामान सोबत नेऊ शकते.