दिल्लीतील तुघलकाबादमध्ये वायूगळती, 310 विद्यार्थ्यांना बाधा

By Admin | Published: May 6, 2017 09:41 AM2017-05-06T09:41:41+5:302017-05-06T15:16:11+5:30

राजधानी नवी दिल्लीतील तुघलकाबाद परिसरात शनिवारी सकाळी वायूगळतीची घटना घडली आहे. यामुळे घटनास्थळापासून जवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना याची बाधा झाली आहे.

Air Gangulati, 310 students halted in Tuglankabad, Delhi | दिल्लीतील तुघलकाबादमध्ये वायूगळती, 310 विद्यार्थ्यांना बाधा

दिल्लीतील तुघलकाबादमध्ये वायूगळती, 310 विद्यार्थ्यांना बाधा

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - राजधानी नवी दिल्लीतील तुघलकाबाद परिसरात शनिवारी (6 मे) सकाळी वायूगळतीची घटना घडली आहे. यामुळे घटनास्थळापासून जवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना याची बाधा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 310 विद्यार्थ्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुघलकाबादमधील राणी झासी सर्वोदय कन्या विद्यालय परिसरातील ही घटना आहे. येथून काही अंतरावर असणा-या कंटेनर डेपोमधील एका ट्रकमधून वायूगळती झाली. यामुळे विद्यार्थ्यांना डोळे आणि घशामध्ये जळजळ होऊन त्रास सुरू लागला.
 
शाळेच्या प्राध्यपकांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 310 विद्यार्थ्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना सफदरजंग आणि एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  पोलीस आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले आहे मदतकार्य वेगाने सुरू आहे. 
 
 
 
- दिल्ली वायुगळतीच्या चौकशीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी डॉक्टरांची पाच सदस्यीय समिती स्थापन केली 
 
- धोकादायक रसायन हाताळताना काळजी न घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल - रोमिल बनिया, डीसीपी

Web Title: Air Gangulati, 310 students halted in Tuglankabad, Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.