विमानानं लंडनसाठी उड्डाण घेतलं, प्रवाशाची महिला केबिन क्रूला मारहाण, फ्लाईट लगेच परतले; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 12:08 PM2023-04-10T12:08:23+5:302023-04-10T12:08:57+5:30

एअर इंडियाच्या विमानात महिला क्रू मेंबरला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

air india delhi to london flight turn around as unruly passenger fights with crew members | विमानानं लंडनसाठी उड्डाण घेतलं, प्रवाशाची महिला केबिन क्रूला मारहाण, फ्लाईट लगेच परतले; नेमकं काय घडलं?

विमानानं लंडनसाठी उड्डाण घेतलं, प्रवाशाची महिला केबिन क्रूला मारहाण, फ्लाईट लगेच परतले; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

गेल्या काही महिन्यापूर्वी एअर इंडियाच्या एका विमानामध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आता एअर इंडियाच्या दिल्ली-लंडन विमानात एका प्रवाशाने महिला केबिन क्रू मेंबरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली-लंडन विमान सोमवारी एका प्रवाशाच्या कृत्यामुळे टेक ऑफ केल्यानंतर विमानतळावर परतले. एका प्रवाशाने क्रू मेंबरसोबत हाणामारी केली. एअर इंडियाच्या AI-111 विमानातील ही घटना आहे. विमान कंपनीने दिल्ली विमानतळ पोलिसांकडे प्रवाशाची तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल!

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान सोमवारी सकाळी लंडनला रवाना झाले होते. टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळातच एक पुरुष प्रवाशी विचित्र वागू लागला. त्याने महिला क्रू मेंबर्सशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. समज देऊनही तो थांबला नाही आणि महिला कर्मचाऱ्यांची हत्या केली. यानंतर आणखी एका महिलेने केबिन क्रूचे केस ओढण्यास सुरुवात केली.

एअर इंडियानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. टेकऑफ झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून आरोपी प्रवाशालाही ताब्यात घेण्यात आल्याचे एअरलाइनने सांगितले. महिला केबिन क्रूला रुग्णालयात नेण्यात आले आहे. या प्रकरणी एअरलाइनकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. 'पहिल्या प्रवाशाला लेखी आणि तोंडी इशारा देण्यात आला होता. पण तो स्वस्थ बसला नव्हता. त्यानंतर त्याने महिला केबिन क्रूवर हल्ला करण्यास सुरुवात केली. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन विमाला परत विमानतळावर उतरवावे लागले, असं या निवेदनात म्हटले आहे. 

Web Title: air india delhi to london flight turn around as unruly passenger fights with crew members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.