Air India ची 'डोमेस्टीक' उड्डाणे ७ दिवसांसाठी रद्द, इंटरनॅशनल उड्डाणांच्या वेळेतही बदल; जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 09:26 PM2023-01-13T21:26:14+5:302023-01-13T21:26:45+5:30
एअर इंडियाने काही मार्गांवरील देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली-
एअर इंडियाने काही मार्गांवरील देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. एअरलाइनच्यावतीनं दिलेल्या माहितीनुसार १९ जानेवारी ते २४ जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनी सकाळी १०:३० ते दुपारी १२:४५ पर्यंत दिल्लीला जाणारी आणि दिल्लीहून उड्डाण घेणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पण नियोजित वेळेच्या आधी किंवा नंतर होणारी उड्डाणे नेहमीप्रमाणे सुरू राहतील असंही सांगण्यात आलं आहे.
एअरलाइनचा निर्णय दिल्ली विमानतळाने जारी केलेल्या नोटिस टू एअरमेन (NOTAM) नुसार आहे. ७४ व्या प्रजासत्ताक दिनापर्यंत एका आठवड्यासाठी दररोज सुमारे तीन तास हवाई क्षेत्र प्रतिबंधित केले जाईल असे एअरलाइनने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्या वेळेत बदल
आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडियानं एक तासाच्या विलंबाने किंवा पुन्हा शेड्यूल करण्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की एलएचआर (लंडन), आयएडी (डलेस), ईडब्ल्यूआर (नेवार्क), केटीएम (काठमांडू) आणि बीकेके (बँकॉक) या पाच स्थानकांवरून अति-लांब पल्ल्याची, लांब पल्ल्याच्या आणि कमी पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशनला एक तास उशीर होणार आहे.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत कोणतेही आंतरराष्ट्रीय ऑपरेशन रद्द करण्यात आलेले नाही. IGI विमानतळ, नवी दिल्ली येथून येणार्या/निर्गमन करणार्या देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याची विनंती केली जात आहे.