विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 05:08 PM2023-01-04T17:08:02+5:302023-01-04T17:09:35+5:30

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Air India |Drunk man pees on female passenger, victim complained directly to the chairman of the Tata Group | विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर...

विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर...

Next


नवी दिल्ली: एअर इंडियाच्याविमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेवर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरची आहे, या घटनेवर विमान कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर वृद्ध महिलेने टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे तक्रार केली, त्यानंतर विमान कंपनीचे अधिकारी सक्रिय झाले आणि त्यांनी दिल्ली पोलिसांकडे FIR दाखल केला आणि तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीला विमान प्रवास करण्यास बंदी घातली.

आरोपी प्रवाशावर 30 दिवसांची बंदी
एअर इंडियाने 28 डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले की, न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमान दिल्लीला येत होते. यावेळी एका प्रवाशाने दारुच्या नशेत बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या एका वृद्ध महिलेवर लघवी केली. या घटनेनंतर, एअर इंडियाने एक अंतर्गत समिती स्थापन केली आणि त्यांनी आरोपी प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये ठेवण्याची शिफारस केली. तसेच, प्रवाशाला 30 दिवस प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोषी आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल.

नशेत इतके होता की...
रिपोर्ट्सनुसार, दुपारच्या जेवणानंतर विमानातील प्रकाश कमी झाला होता, यावेळी नशेत असलेल्या व्यक्तीने महिलेच्या अंगावर लघवी केली. यावेळी सहप्रवाशांनी त्याला पाहिले आणि हटकले. दुसरीकडे, महिलेने क्रूला सांगितले की तिचे कपडे, शूज आणि बॅग लघवीने भिजली आहे, त्यानंतर क्रू मेंबरने तिला कपडे आणि चप्पल दिली आणि तिला तिच्या सीटवर परत येण्यास सांगितले. विमान दिल्लीत उतरल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. यावेळी क्रू मेंबर्स किंवा विमान कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही.

महिलेने टाटा समूहाला पत्र लिहिले
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने थेट टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. त्या महिलेने पत्रात त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर घटना उघडकीस आली आणि अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशावर कारवाई केली. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) विमान कंपनीकडून घटनेचा अहवाल मागवला आहे.

Web Title: Air India |Drunk man pees on female passenger, victim complained directly to the chairman of the Tata Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.