एअर इंडियाचे कर्मचारी आता ‘पीएफ’च्या कक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:52 AM2022-01-17T06:52:28+5:302022-01-17T06:53:09+5:30
सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने विशेष निर्वाह निधी योजना तयार केली होती. त्यानुसार, वेतनातील ठराविक रक्कम ‘एअर इंडिया एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड’ व ‘इंडियन एअरलाईन्स एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड’मध्ये वर्गीत केली जात होती.
मुंबई : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या निर्वाह निधी योजनेतून वगळून ‘पीएफ’च्या कक्षेत आणण्यात आले आहे. खासगीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने विशेष निर्वाह निधी योजना तयार केली होती. त्यानुसार, वेतनातील ठराविक रक्कम ‘एअर इंडिया एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड’ व ‘इंडियन एअरलाईन्स एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड’मध्ये वर्गीत केली जात होती. ही योजना भविष्य निर्वाह निधी कायदा १९२५ अंतर्गत मान्यताप्राप्त होती आणि निवृत्तीनंतर तिचा लाभ घेता येत होता. आता खासगीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेतून नवीन ‘पीएफ’ प्रणालीमध्ये हलवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. चालू महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ठराविक हिस्सा भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होईल.