उड्डाण घेताच Air India विमानाच्या इंजिनला आग, बंगळरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 04:37 PM2024-05-19T16:37:58+5:302024-05-19T16:38:20+5:30
हे विमान बंगळरुवरुन कोचीच्या दिशने जात होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बंगळुरू: उड्डाण घेतल्यानंतर लगेचच एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाच्या एका इंजिनला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. यामुळे विमानाची बंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुहून कोचीला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनला अचानक आग लागली. उड्डाणानंतर लगेचच घडलेल्या या घटनेनंतर क्रू मेंबर्सनी एटीसीला याबाबत माहिती दिली. यानंतर विमान परत बंगळुरू विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या विमानात 6 क्रु मेंबर्ससह 177 प्रवासी होते.
All 177 psgrs, including two infants, and 6 crew members are safe after one of the engines of an Air India Express IX 1132 flight from @BLRAirport to Kochi caught fire midair on Saturday night. It made an emergency landing at KIA at 11.12 pm eight minutes after take-off, said… pic.twitter.com/e41K2YHeCZ
— S. Lalitha (@Lolita_TNIE) May 19, 2024
लँडिंगनंतर तात्काळ सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले असून, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. यानंतर कंपनीने प्रवाशांसाठी पर्यायी विमानांची व्यवस्था केली. सध्या या घटनेची सकोल चौकशी केली जात आहे.