Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 12:49 PM2020-08-08T12:49:12+5:302020-08-08T12:50:42+5:30
Air India Plane Crash in Kerla, latest news: ISFचा ASI अजीत सिंग यांनी ही घटना पाहिली.
कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोळीकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये वैमानिक दीपक साठे यांचाही समावेश आहे. ही दुर्घटना नेमकी कशी झाली, हे एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. (Air India Express Accident)
सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट
हे विमान बोर्इंग 737 होते व ते ठरल्या वेळी म्हणजे साय. 7.41 वाजता विमानतळावर उतरले. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमानात 174 प्रौढ प्रवासी, 10 तान्ही मुले, दोन वैमानिक व चार विमान कर्मचारी असे एकूण 190 जण होते. कोळीकोडचे विमानतळ डोंगरमाथ्यावर आहे व त्याच्या धावपट्टीच्या दुतर्फा दरी आहे. सुदैवाने धावपट्टीवरून घसरले तेव्हा विमानाचा वेग बराच कमी झाला होता. अनुभवी वैमानिक दीपक साठे आणि अखिलेश कुमार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. पण, या प्रयत्नांत दोघांचाही मृत्यू झाला. (Air India Express Accident)
जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये
ISFचा ASI अजीत सिंग यांनी ही घटना पाहिली. त्यांनी सांगितले की,''मी ड्युटीवर होतो. साडेसात वाजता मी तिसऱ्या राऊंडसाठी निघालो. मी PO 2 गेटवर पोहोचलो, ते आमचा आपत्कालीन गेट आहे. तेथे ASI मंगल सिंग होते. मी त्यांच्याकडे स्वाक्षरी करण्यासाठी बुक मागितली आणि त्यांच्यासोबत थोडी चर्चा करत होतो. तेव्हा मी पाहिलं की एअर इंडीयाचं एक विमान असंतुलीत होऊन पॅरामीटर रोडच्या दिशेनं खाली पडत होतं. तेव्हा मी कंट्रोल रुमला त्वरित सांगितले. तोपर्यंत विमान खाली पडलं होतं. त्यामुळे यंत्रणा त्वरित मदतीला पोहोचली. गेट नंबर 8 उघडल्यानंतर 25-30 व्हॉलेंटीयर मदतीसाठी आले, एक जेसीबीपण आली. त्यानं मातीखाली दबलेल्या प्रवाशांना काढण्यात येत होतं. CISFचे सर्व जवानही मदतीला आले.'' (Air India Express Accident)
#WATCH Central Industrial Security Force's ASI Ajeet Singh, an eye witness to #KozhikodePlaneCrash, narrates the incident.
— ANI (@ANI) August 8, 2020
Says, "I saw the Air India Express flight falling down towards the parameter road." pic.twitter.com/kKdQYujrl4
शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स
बोंबला! डुक्करामुळे तो विवस्त्र धावत सुटला, जाणून घ्या व्हायरल फोटोची गंमत...