Air India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 09:51 PM2020-08-07T21:51:34+5:302020-08-07T22:04:15+5:30
Air India Express Accident: एअर इंडियाच्या विमानाला करीपूर विमानतळावर भीषण अपघात
कोझिकोड: केरळच्या कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाला अपघात झाला आहे. दुबईवरून केरळमधल्या करीपूर विमानतळावर लँडिंग होत असताना विमान धावपट्टीवर घसरलं. या विमानात 180हून अधिक प्रवासी होते. संध्याकाळी 7:41 वाजता अपघात झाला. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचं दिसून आलं. (Air India Express Accident)
#WATCH Kerala: Dubai-Kozhikode Air India flight (IX-1344) with 190 people onboard, skidded during landing at Karipur Airport today. (Video source: Karipur Airport official) pic.twitter.com/6zrcr7Jugg
— ANI (@ANI) August 7, 2020
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दुबईहून आलेलं एअर इंडियाचं विमान लँड होत असताना धावपट्टी ओली होती. याशिवाय दृश्यमानतादेखील कमी होती, अशी माहिती नागरी उड्डाण संचलनालयानं (डीजीसीए) दिली. 'एअर इंडिया एक्स्प्रेस विमान दुबईहून कोझिकोडेला येत असताना विमानतळावर उतरल्यानंतर अपघात झाला. करीपूर विमानतळावरील रनवे क्रमांक 10 वर दुर्घटना घडली. यामध्ये विमानाचे दोन तुकडे झाले. विमानात 191 जण होते. विमान लँडिंग करताना दृश्यमानता २ हजार मीटर इतकी होती,' असं डीजीसीएकडून सांगण्यात आलं आहे. डीजीसीएकडून विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
A Dubai-Kozhikode Air India Express flight fell down into the valley after landing at Runway 10 of Karipur Airport & broke down in two pieces. There were 191 people on board. Visibility was 2000 meter at the time of landing: Directorate General of Civil Aviation (DGCA)
— ANI (@ANI) August 7, 2020
एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार बी७३७ विमानात १८४ प्रवासी होते. त्यामध्ये १० लहान मुलांचा समावेश होता. याशिवाय विमानात २ वैमानिकांसह एकूण ७ कर्मचारी होते. विमान धावपट्टीवरून घसरल्यानं अपघात झाला. अपघातानंतर विमानानं पेट घेतला नाही. प्रवाशांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे.