DGCA ची मोठी कारवाई! एअर इंडियाला ३० लाखांचा दंड; वयोवृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर न दिल्याचे प्रकरण भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 03:03 PM2024-02-29T15:03:32+5:302024-02-29T15:11:03+5:30

Air India : ही घटना मुंबई विमानतळावर १२ फेब्रुवारीला घडली होती.

Air India Fined Rs 30 Lakh After Passenger, Not Given Wheelchair, Dies | DGCA ची मोठी कारवाई! एअर इंडियाला ३० लाखांचा दंड; वयोवृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर न दिल्याचे प्रकरण भोवले

DGCA ची मोठी कारवाई! एअर इंडियाला ३० लाखांचा दंड; वयोवृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर न दिल्याचे प्रकरण भोवले

Air India Fined Rs 30 Lakh  (Marathi News) नवी दिल्ली : मुंबईविमानतळावरील एक प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियावर मोठी कारवाई केली आहे. डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. एअर इंडियाने मुंबईविमानतळावर ८० वर्षांच्या वृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर दिली नाही. त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशाला स्वतःहून चालावे लागले व पुढे चालत असताना पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एअर इंडियाला एवढा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. 

ही घटना मुंबई विमानतळावर १२ फेब्रुवारीला घडली होती. बाबू पटेल असे ८० वर्षीय मृत प्रवाशाचे नाव आहे. बाबू पटेल हे आपल्या ७६ वर्षीय पत्नी नर्मदाबेन पटेलसोबत न्यूयॉर्कहून मुंबईत आले होते. त्यावेळी मुंबई विमानतळावर व्हीलचेअर नसल्यामुळे त्यांना एकच व्हीलचेअर असिस्टंट मिळाला. यानंतर वयोवृद्ध बाबू पटेल यांनी आपल्या पत्नीला त्या व्हीलचेअरवर बसवले आणि स्वत: पायी चालले. मात्र चालताना त्यांचा पडून मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत डीजीसीएने एअरलाइन एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. डीजीसीएने सेक्शन-३ सीरीज-एम भाग-२ अंतर्गत एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीसद्वारे डीजीसीएने एअर इंडियाला ७ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. तसेच, वृद्ध जोडप्याने आधीच दोन व्हीलचेअर बुक केल्या होत्या, मग त्यांना एकच व्हीलचेअर का देण्यात आली, असा सवाल डीजीसीएने केला होता.

दरम्यान, मुंबईसह देशातील सर्व विमानतळांवरील गरजा लक्षात घेऊन कोणत्या विमानतळांवर कोणत्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत, याची तपासणी डीजीसीएने सुरू केली आहे. मात्र, डीजीसीएने जाहीर केलेल्या जानेवारीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशभरातील विविध विमान कंपन्या दिव्यांग प्रवाशांबाबत गंभीर नाहीत. ही चिंतेची बाब आहे. गेल्या महिन्यात नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हैदराबाद येथे विंग्स इंडिया २०२४ कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले होते की, २०३० पर्यंत देशातील हवाई प्रवाशांची संख्या दुप्पट म्हणजेच ३० कोटी होईल. ही प्रवाशांची आकडेवारी पाहता वृद्धांना व्हीलचेअर न देण्याची चूक दुर्लक्षित करता कामा नये.

Web Title: Air India Fined Rs 30 Lakh After Passenger, Not Given Wheelchair, Dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.