Air India Flight: शिवीगाळ आणि मारहाण; एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचे क्रू मेंबरसोबत गैरवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 04:57 PM2023-05-30T16:57:24+5:302023-05-30T18:32:07+5:30
Air India Flight News: विमानतळावर विमान उतरताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
Air India Flight Misbehave Incident: गेल्या काही महिन्यांपासून विमानात प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता परत एकदा अशीच घटना घडली असून, यात एअर इंडियाच्याविमानात क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले आहे. एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले की, 29 मे रोजी एका प्रवाशाने फ्लाइट AI882 मध्ये क्रू मेंबर्सना शिवीगाळ केली आणि एकावर हल्लाही केला.
एअर इंडियाने सांगितले की, या घटनेबाबत नियामकालाही (DGCI) माहिती दिली आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशाने आक्रमकपणे वागणे सुरूच ठेवल्याने त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. याआधीही एप्रिल महिन्यात एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते. 10 एप्रिल रोजी दिल्ली-लंडन फ्लाइटमधील एका प्रवाशाने दोन महिला केबिन क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर एअरलाइन्सने आरोपी व्यक्तीवर दोन वर्षांसाठी बंदी घातली होती.
विमान प्रवासात गैरवर्तनाची प्रकरणे वाढली
एअर इंडियाच्या केबिन क्रू सुपरवायझरच्या तक्रारीवरून पोलिसांनी पंजाबमधील आरोपी प्रवाशी जसकीरत सिंग पड्डा (२५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अलीकडे विमान प्रवासात गैरवर्तनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. प्रवाशांनी लघवी केल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. 11 मे रोजी दिल्ली-कोलकाता इंडिगो फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते.