'फ्लाइटमध्ये दारू प्यायल्यानंतर स्वत:वर नियंत्रण ठेवलं नाही, पण...', शंकर मिश्रा यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:35 PM2023-01-11T16:35:50+5:302023-01-11T16:42:17+5:30
गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला सहप्रवासीवर एका प्रवाश्याने दारुचे नशेत लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते.
गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला सहप्रवासीवर एका प्रवाश्याने दारुचे नशेत लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी आरोपी शंकर मिश्रा यांना पोलिसांनी बंगळुरु येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी आज कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी झाली. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.
दिल्लीपोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशालाही आव्हान दिले आहे, ज्यात शंकर मिश्रा यांना कोठडी नाकारण्यात आली होती.
'एफआयआरमध्ये फक्त एक अजामीनपात्र गुन्ह्याचा उल्लेख आहे, बाकीचे जामीनपात्र गुन्हे आहेत. फ्लाइटमध्ये मद्य प्राशन केल्यानंतर तो स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही, यात लैंगिक अत्याचार झालेला नाही, अशी माहिती वकीलांनी दिली. तक्रारदाराची केस त्याला प्रॉमिस्युअस व्यक्ती म्हणून ठेवत नाही. खटल्याला वेळ लागेल, मात्र या आरोपांनंतर शंकर मिश्रा यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे.
'माझ्या अशिलाने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने कथित घटनेशी संबंधित कोणत्याही चौकशीत स्पष्टपणे आणि स्वेच्छेने सहभाग घेतला आहे. ते पोलिसांना तपासात मदत करतील, असंही वकील म्हणाले.
'शंकर मिश्रा यांच्या जामीन अर्जाला दिल्ली पोलिसांनी विरोध केला. त्यांची जामिनावर सुटका झाल्यास तो तक्रारदारावर प्रभाव टाकू शकतो, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारी वकिलांनी सांगितले की, 164 अन्वये तक्रारदाराचे जबाब अनेकांसह नोंदवले गेले आहेत. आणखी जबाब नोंदवणे बाकी आहे.
मागिल शनिवारी दिल्ली पोलिसांनी आरोपी शंकर मिश्रा यांना बंगळुरु येथून ताब्यात घेतले. आरोपीला शनिवारी पटीयाला कोर्टाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी दिली.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर मिश्रा यांच्यावर 26 नोव्हेंबरला न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये एका वृद्ध महिला सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत लघुशंका केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी 4 जानेवारीला आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.