Bat Flying in Air India Flight: हवेत असताना एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ उडताना दिसले; मग काय घडले....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:04 PM2021-05-28T22:04:42+5:302021-05-28T22:12:43+5:30

Bat Flying in Air India Flight: एअर इंडियाच्या विमानाने पहाटे 2:20 वाजता नेवार्कसाठी दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले. विमान जाऊन जवळपास 30 मिनिटे झाली होती. हवेत असताना विमानामध्ये वटवाघूळ उडत असताना दिसले.

Air India Flight Returns Mid-Air To Delhi After Bat Found In Plane on Thursday night | Bat Flying in Air India Flight: हवेत असताना एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ उडताना दिसले; मग काय घडले....

Bat Flying in Air India Flight: हवेत असताना एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ उडताना दिसले; मग काय घडले....

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर एक अजब घटना घडली आहे. गुरुवारी रात्री एअर इंडियाचे (Air India) विमान हवेत असताना वटवाघूळ (Bat flying) दिसल्याने मोठी खळबळ उडाली. ही बाब वैमानिकाला कळताच विमान उड्डाण केल्यानंतर अर्ध्यातासाने पुन्हा ते हवेतूनच माघारी वळवित विमानतळावर उतरविण्यात आले. (The bat was spotted after the Air India plane was in the air for about 30 minutes.)


एअर इंडियाच्या विमानाने पहाटे 2:20 वाजता नेवार्कसाठी दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले. विमान जाऊन जवळपास 30 मिनिटे झाली होती. हवेत असताना विमानामध्ये वटवाघूळ उडत असताना दिसले. यानंतर पायलटने तातडीने विमान माघारी वळवत दिल्ली विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, AI-105 DEL-EWR या विमानात लोकल स्टँडबाय इमरजन्सी घोषित करण्यात आली. यानंतर विमान पुन्हा विमानतळावर उतरविण्यात आले. उतरल्यानंतर समजले की, केबिन क्रू मेंबरनी विमानात वटवाघूळ उडताना पाहिले होते. 


यामुळे या वटवाघळाला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. विमान जवळपास 3:55 वाजता विमानतळावर परतले होते. 


विमानात धूर केल्यानंतर मेले 
डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वटवाघूळाला बाहेर काढण्यासाठी विमानात धूर करण्यात आला. यामुळे हे वटवाघूळ मेले. हे विमान नेवार्कसाठी ये-जा करते. 

Web Title: Air India Flight Returns Mid-Air To Delhi After Bat Found In Plane on Thursday night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.