एअर इंडियात गोंधळ घातला तर आता 15 लाख दंड !
By admin | Published: April 17, 2017 05:23 PM2017-04-17T17:23:05+5:302017-04-17T19:18:04+5:30
गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे. गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे. गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला 1 तास उशीर झाला तर 5 लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर 2 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 15 लाखाचा दंड आकारण्याची तयारी एअर इंडिया करत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात एअरइंडियाच्या एका कर्मचा-यासोबत शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीनंतर एअर इंडिया गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी नियम बनवण्याचा विचार करत आहे. लवकरच हा नियम लागू होऊ शकतो. या नियमानुसार गोंधळ घालणा-या प्रवाशाची लगेच पोलिसात तक्रार केली जाणार आहे.
याशिवाय विमानाला 1 तास उशीर झाल्यास 5 लाख आणि 2 तास उशीर झाल्यास 15 लाखांचा दंड आकारण्याचा नियम एअर इंडिया आणणार आहे. पण जर कोणत्याही चुकीशिवाय म्हणजे एअर इंडियामुळेच जर विमानाला उशीर झाला तर कोणत्याही दंडाची तरतूद नाही. एअर इंडियाशिवाय अन्य विमान कंपन्याही असा नियम बनववणार असल्याचं वृत्त आहे.
यापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांच्या विमानप्रवासामुळे वादंग निर्माण झाला होता. त्यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावरही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लेखी आदेशानुसार शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी हटवण्यात आली होती.