Women’s Day 2019 : एअर इंडिया विमानांच्या कॉकपिटमध्ये आज फक्त 'महिलाराज'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 10:25 AM2019-03-08T10:25:38+5:302019-03-08T10:46:08+5:30
एअर इंडियाने महिला दिनानिमित्त हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत.
नवी दिल्ली - जगभरात आज महिला दिन (International Womens Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. एअर इंडियाने महिला दिनानिमित्त हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत. त्याचबरोबर विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एअर इंडियाने महिला दिनानिमित्त एक चांगली घोषणा केली आहे.
एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे कारण, एअर इंडियाच्या महिला कर्मचारी जागतिक स्तरावर एव्हिएशन क्षेत्रात आपला ठसा उमटवतील. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो' असे म्हटले आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-सिडनी, मुंबई-लंडन, दिल्ली-रोम, दिल्ली-लंडन, मुंबई-दिल्ली-शांघाई, दिल्ली-पॅरिस, मुंबई-नेवार्क, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-वॉशिंग्टन, दिल्ली-शिकागो आणि दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को या विमानांची धुरा ही आज महिलांच्या हाती असणार आहे.
Air India to operate 12 international, 40 domestic flights with all-women crew on Women’s Day
— ANI Digital (@ani_digital) March 7, 2019
Read @ANI Story | https://t.co/tdl9MNjOqOpic.twitter.com/OqtPmJxz9U
Women's Day 2019 : गुगलचं खास डुडल, नारी शक्तीला सलाम!
गुगलने 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे. गुगलने खास डुडलद्वारे स्त्री शक्तीला सलाम केला आहे. आज जगभरात महिला शक्ती आणि महिलांच्या सन्मानासाठी महिला दिन (International Womens Day) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत. गुगलने या खास आणि महत्त्वपूर्ण डुडल स्लाइडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे.
Women's Day 2019 : गुगलचं खास डुडल, नारी शक्तीला सलाम!https://t.co/t350G2i4Sg#WomensDay2019
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 8, 2019
Women's Day Special : ‘जागतिक महिला दिन’ 8 मार्चला का साजरा केला जातो?
आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सोशल मीडियातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च हा महिला दिवस 1943 साली साजरा झाला. 1971 सालच्या 8 मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही काही घरांमधूनही 8 मार्च साजरा होत आहे.
#HappyWomensDay2019 ‘जागतिक महिला दिन’ ८ मार्चला का साजरा केला जातो? https://t.co/sfUM18xEgU
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 8, 2019