Mahatma Gandhi Jayanti : एअर इंडियाकडून महात्मा गांधींना अनोखी आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 10:24 AM2019-10-02T10:24:29+5:302019-10-02T10:25:09+5:30

Gandhi Jayanti 2019 : महात्मा गांधीजींच्या जंयतीनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Air India pays tribute to Mahatma Gandhi | Mahatma Gandhi Jayanti : एअर इंडियाकडून महात्मा गांधींना अनोखी आदरांजली

Mahatma Gandhi Jayanti : एअर इंडियाकडून महात्मा गांधींना अनोखी आदरांजली

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एअर इंडिया विमान कंपनीकडून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या एका विमानावर महात्मा गांधींचे छायाचित्र काढून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

दरम्यान, महात्मा गांधीजींच्या जंयतीनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

तसेच, महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, महात्मा गांधी यांच्यासह आज स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे. 

महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1859 रोजी गुजरातच्या पोरबंदरमध्ये झाला होता. मोहनदास करमचंद गांधी असे त्यांचे संपूर्ण नाव. अहिंसेच्या मार्गावर चालत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी 6 जुलै 1944 रोजी रेडिओ रंगूनमधून गांधीजींना 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधले होते. महात्मा गांधींचा जन्मदिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
 

Web Title: Air India pays tribute to Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.