एअर इंडियामध्ये वैमानिक, केबिन क्रूची मेगा भरती
By admin | Published: July 27, 2016 02:09 PM2016-07-27T14:09:30+5:302016-07-27T14:09:30+5:30
एअर इंडिया पुढच्या दोन ते तीन वर्षात ५०० वैमानिक आणि १५०० पेक्षा जास्त केबिन क्रू सदस्यांची भरती करणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - एअर इंडिया पुढच्या दोन ते तीन वर्षात ५०० वैमानिक आणि १५०० पेक्षा जास्त केबिन क्रू सदस्यांची भरती करणार आहे. एअर इंडिया आपल्या विमान ताफ्याचा विस्तार करणार आहे. विस्तारानंतर मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन एअर इंडियाची वैमानिक आणि केबिन क्रू सदस्यांच्या भरतीची योजना आहे.
एअर इंडियाने २५० वैमानिकांची आधीच भरती केली असून, आणखी ५०० वैमानिकांची गरज लागेल. वैमानिकांच्या ४०० जागांच्या भरतीची जाहीरात आधीच प्रसिद्ध झाल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. मागच्यावर्षी एअर इंडियाला २०० प्रशिक्षणार्थी वैमानिकांची गरज होती. त्यातील फक्त ७८ जणांची निवड केली.
यावर्षी डिसेंबरपर्यंत १५० वैमानिकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. एअर इंडियाच्या सेवेत सध्या ८५८ वैमानिक आहेत. मागच्या दोनवर्षात एअर इंडियाच्या १०० वैमानिकांनी नोकरी सोडली आहे. केबिन क्रू ची सदस्य संख्या तीन हजारपर्यंत वाढवण्याची योजना आहे. पुढच्या चारवर्षात एअर इंडियाच्या ताफ्यात नवीन १०० विमाने दाखल होतील.