विमानात मद्यपान करणारे जेट, एअर इंडियाचे वैमानिक निलंबित
By admin | Published: August 12, 2016 01:49 PM2016-08-12T13:49:35+5:302016-08-12T14:19:23+5:30
मद्यपान करुन विमानात बसणा-या वैमानिकांविरोधात जेट एअरवेज आणि एअर इंडियाने कठोर कारवाई केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - मद्यपान करुन विमानात बसणा-या वैमानिकांविरोधात जेट एअरवेज आणि एअर इंडियाने कठोर कारवाई केली आहे. तपासणीमध्ये दोन्ही वैमानिकांनी मद्यपान केल्याचे आढळून आल्यानंतर दोघांना चारवर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
यामध्ये एअर इंडियाच्या एका केबिन क्रू सदस्याचा समावेश असून, त्याला वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. डीजीसीएने जेट आणि एअर इंडियाला या वैमानिकांविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
तीन ऑगस्टला जेट एअरवेजच्या अबू धाबी-चेन्नई विमानाच्या वैमानिकाने मद्यपान केल्याचे आढळून आले. १० ऑगस्टला एअर इंडियाच्या शारजा-कोझीकोडे विमानाच्या वैमानिकाने मद्यपान केले होते. भारतात दोन्ही विमानांचे लँण्डीग झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली.
लँण्डींगनंतर प्रथमच वैमानिकांची तपासणी करण्यात आली. विमानाचा ताबा घेण्यापूर्वी वैमानिकांची तपासणी केली जाते. सुरक्षा नियमांचे उल्लंघन कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही असे जेट एअरवेजने स्पष्ट केले आहे.
स्पाईस जेटच्या 63 वैमानिकांवर निलंबनाची कारवाई
स्पाईस जेटच्या 63 वैमानिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परवानगीपेक्षा जास्त तास विमान उडवून प्रवाशांच्या सुरक्षेचा धोका निर्माण केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. भारतीय नागरी विमान वाहतूक संचलनालयाने ही कारवाई केली असून सुरक्षा नियामकाने ठरवून दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त तास विमान उडवण्यात आले.