'Air India Plane Crash' : केरळ विमान दुर्घटनेतील मृतांपैकी दोघे कोरोना पॉझिटिव्ह, मदत कार्यात सहभागी झालेल्यांची होणार चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 12:36 IST2020-08-08T11:57:47+5:302020-08-08T12:36:34+5:30
कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोझीकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले होते.

'Air India Plane Crash' : केरळ विमान दुर्घटनेतील मृतांपैकी दोघे कोरोना पॉझिटिव्ह, मदत कार्यात सहभागी झालेल्यांची होणार चाचणी
कोझिकोडे - केरळमधील कोझिकोडे येथे झालेल्या विमानअपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर उतरताना विमान घसरून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य करणाऱ्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. केरळ सरकारमधील मंत्री ए. सी. मोइद्दीन यांनी याला दुजोरा दिला आहे.
कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोझीकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले होते. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन वैमानिकाचाही समावेश आहे.
हे विमान बोर्इंग ७३७ होते व ते ठरल्या वेळी म्हणजे साय. ७.४१ वाजता विमानतळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमानात १७४ प्रौढ प्रवासी, १० तान्ही मुले, दोन वैमानिक व चार विमान कर्मचारी असे एकूण १९० जण होते.
जिथे अपघात झाला ते विमानतळ डोंगरमाथ्यावर आहे व त्याच्या धावपट्टीच्या दुतर्फा दरी आहे. सुदैवाने धावपट्टीवरून घसरले तेव्हा विमानाचा वेग बराच कमी झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी