चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 08:15 AM2020-02-01T08:15:09+5:302020-02-01T08:19:30+5:30
चीनमधील वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर हे विद्यार्थी तिथे अडकून पडले होते.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूने थैमान घातलेल्या चीनमधील वुहान येथून 324 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन निघालेले एअर इंडियाचे विशेष विमान दिल्लीत दाखल झाले आहे. वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर हे विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शुक्रवारी एअर इंडियाचे विशेष विमान रवाना करण्यात आले होते.
Delhi: #CoronaVirus screening will be conducted by a team of doctors at Delhi Airport for all the 324 Indians who have arrived in the Air India special flight from Wuhan (China). Later on, if necessary, they will be put under medical observation. https://t.co/nhLnq2GIz8pic.twitter.com/NgGep1mM6q
— ANI (@ANI) February 1, 2020
आज सकाळी 7.00 च्या सुमारासा हे विमान दिल्लीत दाखल झाले. वुहान येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवण्यात आलेल्या विमानामध्ये दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील 5 डॉक्टरांचे पथक होते. तसेच पॅरा मेडिकल स्टाफ उपस्थित होता. या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक ती औषधे, मास्क, पाकीटबंद भोजन उपलब्ध होते. त्याशिवाय इंजिनियर्स आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथकसुद्धा विमानात तैनात करण्यात आले होते.
चीनमधील हुबेई प्रांत हा कोरोना विषाणूचा फैलाव झालेले मुख्य केंद्र मानण्यात येत आहे. हुबेई ही वुहानची प्रांतीय राजधानी आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे सुमारे 700 भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. यापैकी बहुतांश लोक हे मेडिकलचे विद्यार्थी आणि संशोधक आहेत.
कोरोना विषाणूचा धोका वाढला, जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित
Corona: जीवघेण्या कोरोना व्हायरसचं नाव कोरोना का पडलं असेल? जाणून घ्या कारण...
केरळमधील कोरोना रुग्ण सरकारी इस्पितळात दाखल; १५०३ जणांची तपासणी
दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असून, आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण होऊन 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 11 हजार 791 जणांना या विषाणूची लागण झाली आहे.