विलीनीकरणानंतर एअर इंडिया प्रथमच नफा जाहीर करणार ?

By admin | Published: April 19, 2016 05:36 PM2016-04-19T17:36:26+5:302016-04-19T17:36:26+5:30

सातत्याने तोटयाचा सामना करणारी एअर इंडिया आर्थिकवर्ष २०१६ मध्ये आठ ते दहा कोटींचा नफा जाहीर करण्याची शक्यता आहे.

Air India will announce profit after the merger? | विलीनीकरणानंतर एअर इंडिया प्रथमच नफा जाहीर करणार ?

विलीनीकरणानंतर एअर इंडिया प्रथमच नफा जाहीर करणार ?

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १९ - सातत्याने तोटयाचा सामना करणारी एअर इंडिया आर्थिकवर्ष २०१६ मध्ये आठ ते दहा कोटींचा नफा जाहीर करण्याची शक्यता आहे. २००७ मध्ये इंडियन एअरलाईन्सबरोबर झालेल्या विलीनीकरणानंतर प्रथमच एअर इंडिया नफ्याची घोषणा करु शकते. आर्थिकवर्ष २०१५ मध्ये ५,५७४.४७ कोटींचा तोटा झाला होता. त्या तोटयामध्ये यंदा २६०० ते २८०० कोटींपर्यंत घट झाली आहे. 
 
एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवायची आहे. जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये कमी तिकीट दराची जी स्पर्धा सुरु आहे त्यामुळे २०१६ मध्ये एअर इंडियाच्या नफ्यामध्ये घसघशीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे. 
 
२०१५ मध्ये एअर इंडियाने १९,७८१ कोटींची कमाई केली. एअर इंडियाला २१७१.४० कोटींचा तोटा झाला. प्रवासी संख्या वाढूनही एअर इंडियाच्या उत्पन्नात ९ ते १० टक्के घट झाली. चालू वर्षात महसूलात १० टक्के वाढ होण्याचा अंदाज अधिका-याने वर्तवला. जागतिक तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे एअर इंडियाच्या तोटयात घट होऊन महसूल काही प्रमाणात वाढला 
 

Web Title: Air India will announce profit after the merger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.