टाटांची एअर इंडिया घेणार ४७० नवीन विमाने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:21 AM2023-02-15T11:21:19+5:302023-02-15T11:21:46+5:30
नवीन विमानांपैकी पहिले विमान २०२३ च्या उत्तरार्धात सेवेत दाखल होईल
नवी दिल्ली : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने मंगळवारी सांगितले की, ते एअरबस आणि बोइंगकडून एकूण ४७० वाइड बॉडी आणि नॅरो बॉडी विमाने खरेदी करणार आहेत. यात ४० एअरबस ए ३५० एस, २० बोइंग ७८७ आणि १० बोइंग ७७७-९ एस वाइड बॉडी विमानांचा समावेश आहे. तसेच, २१० एअरबस ए ३२०/ ३२१ निओस आणि १९० बोइंग ७३७ मॅक्स यांचा समावेश आहे.
नवीन विमानांपैकी पहिले विमान २०२३ च्या उत्तरार्धात सेवेत दाखल होईल आणि बहुतेक विमाने २०२५ च्या मध्यापासून येणार आहेत.