‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 05:04 AM2020-01-29T05:04:04+5:302020-01-29T05:05:07+5:30

Air India Sale : पुरी यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या विक्रीसाठी आम्ही आठ रोड शो घेतले आहेत.

Air India will relax terms for sale S. Information about Puri | ‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती

‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती

Next

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकारने आपल्या दुसऱ्या प्रयत्नातील निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती बºयाच सुटसुटीत केल्या असल्या तरी पात्र निविदाधारकांसाठी त्या आणखी शिथिल करण्याचा मार्ग अजूनही खुला आहे, असे उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांनी म्हटले आहे.
पुरी यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या विक्रीसाठी आम्ही आठ रोड शो घेतले आहेत. आधीच्या फसलेल्या प्रयत्नांतून आम्ही धडा घेतला. रोड शोमधून आम्ही सूचना घेतल्या. मागील वेळी विकण्याची प्रक्रिया सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच हाती घेतली गेली होती. अशा काळात सरकारी कंपनी खरेदी करणे खरेदीदारांसाठी अजिबात सोयीचे नव्हते. पुरी म्हणाले की, ‘निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत एअर इंडियाला ब्रिज फंडिंग मिळत राहील. निर्गुंतवणूक प्रक्रिया पुढे नेण्यासाठी अंतिम टप्प्यात अटी व शर्ती आणखी शिथिल करण्याचा मार्ग मोकळाच आहे. याशिवाय सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचेही रक्षण केले जाईल. निर्गुंतवणुकीनंतरही कर्मचाºयांचे हितरक्षण कसे होईल, यावर आम्ही काम करीत आहोत.

कर्मचारी संख्या कमीच
दरम्यान, एअर इंडियाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी सांगितले की, एअर इंडियात जास्तीचे कर्मचारी नाहीत. उलट नव्या कंपनीस आणखी कर्मचाºयांची गरज लागेल. एअर इंडियात २0१२ नंतर एकही कायम कर्मचारी घेतलेला नाही. या काळात नवी विमाने घेतली. नवीन उड्डाणे वाढविली. एअर इंडिया व संबंधित कंपन्यांत मिळून ३0 हजार कर्मचारी आहेत. एआय आणि एआय एक्स्प्रेसमध्ये १७,९८४ कर्मचारी असून, त्यातील ९,६१७ कर्मचारी कायम आहेत. ३६ टक्के कायम कर्मचारी आगामी पाच वर्षांत निवृत्त होत आहेत.

Web Title: Air India will relax terms for sale S. Information about Puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.