एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 06:20 AM2021-02-07T06:20:10+5:302021-02-07T06:20:46+5:30

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बाेली लावणाऱ्या प्रत्येक कंपनीला एक काेड देण्यात येणार आहे. पुढील सर्व प्रक्रिया हा काेड वापरूनच करण्यात येतील, तसेच माहिती गाेपनीय ठेवण्यासाठी अंडरटेकिंगही घेण्यात येणार आहे. 

Air Indias bidders names to be confidential says Finance minister amp | एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय

एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय

Next

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षात केंद्र सरकार एअर इंडियाच्या विक्रीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. विविध कंपन्यांनी त्यासाठी इच्छा नाेंदविली आहे. मात्र, अंतिम प्रक्रियेत बाेली लावणाऱ्या कंपन्यांची नावे गाेपनीय ठेवण्यात येतील, असे केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बाेली लावणाऱ्या प्रत्येक कंपनीला एक काेड देण्यात येणार आहे. पुढील सर्व प्रक्रिया हा काेड वापरूनच करण्यात येतील, तसेच माहिती गाेपनीय ठेवण्यासाठी अंडरटेकिंगही घेण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकाेनातून हे पाऊल उचलण्यात आले असून, काही ठरावीक संस्थांनाच ही माहिती देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूह आणि एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनी समूहानेच ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ दाखल केले आहे.

Web Title: Air Indias bidders names to be confidential says Finance minister amp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.