तब्बल 5 तासांनंतर एअर इंडियाचा सीता सर्व्हर सुरु; प्रवाशांची प्रचंड गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 07:54 AM2019-04-27T07:54:04+5:302019-04-27T09:21:50+5:30

देशभरात सीता सर्व्हर बंद पडल्याने विमानांचे उड्डाण रखडले आहे.

Air-India's flights affected due to Sita server is down all over India | तब्बल 5 तासांनंतर एअर इंडियाचा सीता सर्व्हर सुरु; प्रवाशांची प्रचंड गैरसोय

तब्बल 5 तासांनंतर एअर इंडियाचा सीता सर्व्हर सुरु; प्रवाशांची प्रचंड गैरसोय

Next

 मुंबई : एकीकडे नुकसानीच्या गर्तेत अडकलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला आज मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. कंपनीचा सीता सर्व्हरच बंद पडल्याने पहाटे 3.30 पासून विमानोड्डाणे ठप्प झाली होती. हा सर्व्हर तब्बल 5 तासांनी सुरु झाल्याची घोषणा संचालक अश्विनी लोहाणी यांनी केली आहे. 


देशभरात सीता सर्व्हर बंद पडल्याने विमानांचे उड्डाण रखडले आहे. यामुळे मुंबई, दिल्लीसहविमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दिल्लीविमानतळावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

पहाटे 3.30 वाजल्यापासून एकाही विमानाचे उड्डाण झाले नसल्याचे समजते. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. 



 

यावर एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला असून सीता सर्व्हर डाऊन झाल्याने विमानउड्डाणे रखडली आहेत. आमची तंत्रज्ञ यावर काम करत आहेत. लवकरच सर्व्हर सुरळीत सुरु होईल, असे सांगितले.



 



Web Title: Air-India's flights affected due to Sita server is down all over India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.