एअर इंडियाचे खासगीकरण पक्के

By Admin | Published: June 29, 2017 01:34 AM2017-06-29T01:34:53+5:302017-06-29T01:34:53+5:30

तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा तोटा असलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्यास केंद्राने बुधवारी तत्त्वत: मान्यता दिली आहे

Air-India's privatization | एअर इंडियाचे खासगीकरण पक्के

एअर इंडियाचे खासगीकरण पक्के

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा तोटा असलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्यास केंद्राने बुधवारी तत्त्वत: मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.
निति आयोगाने खासगीकरणाची शिफारस केल्यानंतर जेटली व नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी तसे संकेत दिले होते. विमान व्यवसायातील व अन्य कंपन्याही खासगीकरणाच्या प्रक्रियेत स्पर्धा करू शकतील, असे नूद करून जेटली म्हणाले की, भारतात ५00 ते ६00 तर चीनमध्ये ५ हजार विमाने आहेत. भारतात विमान वाहतुकीला मोठी संधी आहे.
याआधी एअर इंडियाला ३0 हजार कोटी रुपये देण्यात आले. तरीही तिचे कर्ज व तोटा वाढत आहे. कंपनीचे २२ हजार कोटींचे कर्ज माफ झाल्यास आणि काही मालमत्ता विकल्यास एअर इंडियावरील बोजा कमी वा संपण्यास मदत होईल.
सरकार तोट्याचे काय करणार?
एअर इंडियाचे खासगीकरण कशा प्रकारे करायचे, हे सरकारने अद्याप ठरविलेले नाही. तसेच एअर इंडियाचा सध्याचा तोटा सरकार भरून काढणार किंवा कसे, हेही निश्चित झालेले नाही.
एअर इंडियावर कर्जाचा बोजा असून, त्याची पुनर्रचना करण्यासाठी बँकांशी बोलणीही सुरू आहेत. त्यामुळे ती प्रक्रियाही पूर्ण व्हावी लागेल.
एअर इंडिया ही कंपनी पूर्णपणे विक्रीत काढायची की त्यात केंद्र सरकारचा काही हिस्सा ठेवायचा, हेही अद्याप नक्की
झालेले नाही.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव घसरल्यामुळे आणि प्रवासी संख्येत वाढ झाल्याने फक्त २0१५-१६
मध्येच कंपनीला 105 कोटींचा नफा झाला होता.
एअर इंडियाने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या 15 टक्क्यांच्या आसपास आहे.

Web Title: Air-India's privatization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.