Delhi Pollution Level: दिल्लीत वायू प्रदूषणामुळे दरवर्षी १५ लाख जणांचा मृत्यू, प्रत्येकाचं ९ वर्षांनी घटतंय आयुष्य; धक्कादायक अहवाल समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 05:55 PM2021-11-06T17:55:36+5:302021-11-06T17:55:57+5:30
Delhi Pollution Level: देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी तब्बल १५ जणांचा मृत्यू होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला ...
Delhi Pollution Level: देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी तब्बल १५ जणांचा मृत्यू होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. इतकंच नव्हे, तर दिल्लीत राहत असलेल्या लोकांचं वायू प्रदूषणाच्या समस्येमुळे ९.५ वर्षांनी आयुष्य कमी होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. लंग्स केअर फाऊंडेशनच्या दाव्यानुसार दिल्लीत प्रत्येक तिसऱ्या लहान मुलामागे एकाला अस्थमाचा त्रास आहे. आधीच वायू प्रदूषणाची समस्या गंभीर असताना दिल्ली आणि एनसीआर भागात दिवाळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. ज्यानंतर हवेची गुणवत्ता अतिशय गंभीर श्रेणीत येऊन पोहोचली आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाचा ५ वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनीही दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून प्रदूषणाचा स्तर वाढला असल्याची कबुली दिली आहे. यामागची दोन कारणं देखील सांगण्यात आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात दिल्ली व एनसीआर भागात पेंढा जाळण्यास सुरुवात होते. जवळपास ३५०० ठिकाणी पेंढा जाळण्यात आल्याची माहिती समोर आळी आहे. दुसरीकडे दिवाळीच्या निमित्तानं फटाके फोडण्याचंही प्रमाण वाढतं. यामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे.
थंडी वाढल्यानं प्रदूषण वाढते यामागे कोणतंही तथ्य नसल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. पेंढा जाळण्याच्या घटना वाढल्या आहेत आणि आतषबाजी याचाच हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात हवेचा स्तर थोडा सुधारण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात दिल्लीतील हवेची गुणवत्ता अतिशय खालच्या पातळीवय येऊन पोहोचते. २०१६ साली दिल्लीतील हवेच्या मुलांक ४३१ पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर एका वर्षानंतर यात घट होऊन २०१७ साली ३१९ इतका होता. पण हा स्तरही घातकच समजला जातो. २०१८ साली ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर २८१ इतका होता. तर २०१९ रोजी ३३७ वर पोहोचला होता. २०२० मध्ये १४ नोव्हेंबरमध्ये हाच आकडा ४१४ इतका झाला होता. यावेळी तर नवा रेकॉर्ड प्रस्थापित करत हवेच्या गुणवत्तेचा स्तर तब्बल ५३३ वर पोहोचला आहे.