विमानात बॉम्बची अफवा

By admin | Published: March 23, 2016 02:54 AM2016-03-23T02:54:35+5:302016-03-23T02:54:35+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सायंकाळी जेट एअरवेजच्या दिल्ली-चेन्नई विमानाची

Air raid | विमानात बॉम्बची अफवा

विमानात बॉम्बची अफवा

Next

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सायंकाळी जेट एअरवेजच्या दिल्ली-चेन्नई विमानाची ‘इमर्जन्सी लँडिंग’ झाल्यानंतर या विमानाची चार तास कसून तपासणी करण्यात आली. संपूर्ण तपासणी केल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने कोणताच धोका नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रात्री ८.५० वाजता हे विमान चेन्नईकडे रवाना झाले.
बॉम्बची अफवा पसरल्यानंतर हे विमान तातडीने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. विमानतळाच्या डावीकडील ‘आयसोलेशन बे’ मध्ये विमान ठेवण्यात आले. बराच वेळ प्रवाशांना विमानातच बसवून तपासणी करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना टर्मिनल बिल्डींगच्या एका भागात बसविण्यात आले. सीआयएसएफ, पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि इतर एजन्सींनी विमान, प्रवासी आणि सामानाची तपासणी केली. चेन्नईसाठी दिल्लीवरून दुपारी ३ वाजता निघालेल्या प्रवाशांना नागपूर विमानतळावर जेट एअरवेजतर्फे चहा आणि नाश्ता पुरविण्यात आला. ‘इमर्जन्सी लँडींग’ झाल्यामुळे प्रवाशात भीतीचे वातावरण होते. याशिवाय विमानाच्या तपासात उशीर होत असल्यामुळे प्रवासी आणखीनच घाबरले. या विमानात (९ डब्ल्यू ८२९) पायलटसह १६१ प्रवाशांचा समावेश होता. विमानाच्या ‘इमर्जन्सी लँडिंग’ दरम्यान नागपूर विमानतळावर कार्यरत संबंधित एअरलाईन्सचे कर्मचारीही हे विमान जाईपर्यंत थांबले होते. नियमित विमानांच्या संचालनासोबत ‘इमर्जन्सी लँडिंग’ झालेल्या विमानातील प्रवाशांची देखभाल आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअरलाईन्सच्या मुख्यालयातून प्रवाशांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हे विमान चेन्नईकडे झेपावल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. (प्रतिनिधी)

प्रशासन दक्ष
४विमानतळावरील सूत्रांनुसार बेल्जियमच्या ब्रुसेल्स विमानतळावर बॉम्बहल्ला झाल्यानंतर जेट एअरवेजच्या काही विमानात बॉम्बची शंका असल्याची माहिती दिल्ली एअर ट्राफिक कंट्रोलने नागपूर ‘एटीसी’ला दिली. सूचना मिळताच नागपूर विमानतळावर त्वरित उपाययोजना करण्यात आली. अग्निशमन विभाग, अभियांत्रिकी शाखेचे कर्मचारी, रुग्णवाहिका आदींची व्यवस्था करण्यात आली. बॉम्बच्या अफवेमुळे विमानातील प्रवाशांसोबतच क्रू मेंबर्सला अतिरिक्त तपासाला सामोरे जावे लागले.

Web Title: Air raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.