कारमध्ये पुढे बसणाऱ्यांठी आता एअरबॅग अनिवार्य?; लवकरच नियम लागू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 02:14 PM2020-12-30T14:14:19+5:302020-12-30T14:17:58+5:30

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग अनिवार्य करण्याचा तयार करण्यात आला प्रस्ताव

Airbags now mandatory for those sitting in the front of the car; The rules are likely to take effect soon | कारमध्ये पुढे बसणाऱ्यांठी आता एअरबॅग अनिवार्य?; लवकरच नियम लागू होण्याची शक्यता

कारमध्ये पुढे बसणाऱ्यांठी आता एअरबॅग अनिवार्य?; लवकरच नियम लागू होण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देलोकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आला प्रस्तावरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ड्राफ्ट नोटिफिकेशन जारीगाड्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता

कारमध्ये पुढच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारनं आता कारमध्ये पुढील भागात एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार केला आहे. यासंबंधी एक प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. अपघाताच्या प्रसंगी प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळवारी यासंबंधी एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. कारमध्ये पुढे बसणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 

१ एप्रिल २०२१ पासून हा निर्णय नव्या गाड्यांसाठी लागू होण्याची शक्यता आहे. तर सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांसाठी १ जूनपासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर २८ डिसेंबर रोजी हा ड्राफ्ट प्रकाशित करण्यात आला आहे. तसंच यासंबंधी काही सूचना असल्यास त्या ३० दिवसांच्या आत morth@gov.inwithin या ईमेलवर पाठवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. 

वाहनांची किंमत वाढणार

सरकारच्या या प्रस्तावानंतर फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार जर एअर बॅग अनिवार्य करण्यात आल्या तर गाड्यांची किंमत वाढू शकते. विक्रीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी उत्पादकांना याचा खर्च स्वत:हून करावा लागणार असल्याचंही म्हटलं आहे. "सरकारचा एअर बॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव हा अतिशय योग्य आहे. हे सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य असून ते जागतिक दर्जानुसार बनवले गेले पाहिजेत," असंही मत FADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितलं.
 

Web Title: Airbags now mandatory for those sitting in the front of the car; The rules are likely to take effect soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.