एअरसेल-मॅक्सिस खटला : मारन बंधूंसह अन्य आरोपींची सुटका

By admin | Published: February 2, 2017 05:56 PM2017-02-02T17:56:55+5:302017-02-02T17:56:55+5:30

एअरसेल- मॅक्सिस खटल्यामध्ये माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि त्यांचा भाऊ कलानिधी मारन यांना दिलासा मिळाला

Aircel-Maxis case: Release of other accused including Maran brothers | एअरसेल-मॅक्सिस खटला : मारन बंधूंसह अन्य आरोपींची सुटका

एअरसेल-मॅक्सिस खटला : मारन बंधूंसह अन्य आरोपींची सुटका

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - एअरसेल- मॅक्सिस खटल्यामध्ये  माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि त्यांचा भाऊ कलानिधी मारन यांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टातील एका विशेष न्यायालयाने आज या खटल्यातून मारन बंधूंसह अन्य आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली आहे. 
सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाने  मारन बंधूंसह इतर आरोपींविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या खटल्यावर निकाल देताना न्यायालयाने या सर्वांविरोधात सबळ पुरावे नसल्याचे सांगत सर्वांची खटल्यातून मुक्तता केली. 
 2006 साली चेन्नईतील टेलिकॉम प्रमोटर सी. शिवशंकर यांच्यावर एअरसेल आणि तिच्या सहयोगी कंपन्यांमधील त्यांचे समभाग मलेशियातील मॅक्सिस ग्रुपला विकण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप मारन यांच्यावर ठेवण्यात आला होता.  मात्र दयानिधी मारन यांनी हे आरोप फेटाळून लावले होतो.  

Web Title: Aircel-Maxis case: Release of other accused including Maran brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.