भारतात होणार विमानांची निर्मिती; पुणे आणि नागपूरचे नाव आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:27 AM2018-09-22T05:27:08+5:302018-09-22T05:27:14+5:30

विदेशातून खरेदी केल्या जाणाऱ्या विमानांसाठी येणारा मोठा खर्च पाहता भारतातच विमानांचे उत्पादन करण्याचा विचार सरकार करीत आहे.

Aircraft production in India; Pune and Nagpur are in the forefront | भारतात होणार विमानांची निर्मिती; पुणे आणि नागपूरचे नाव आघाडीवर

भारतात होणार विमानांची निर्मिती; पुणे आणि नागपूरचे नाव आघाडीवर

Next

- संतोष ठाकूर 
नवी दिल्ली : विदेशातून खरेदी केल्या जाणाऱ्या विमानांसाठी येणारा मोठा खर्च पाहता भारतातच विमानांचे उत्पादन करण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यासाठी काही देशांसोबत तंत्रज्ञान हस्तांतरण कराराबाबत चर्चा करण्यात येत आहे. या देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे.
भारताला आगामी २० वर्षांत किमान दोन हजार विमानांची गरज भासणार आहे. त्यावर आगामी दहा वर्षांत जवळपास ५० बिलियन डॉलर खर्च होण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे की, विमानांच्या निर्मितीसाठी पुणे अथवा नागपूर एक मोठे हब बनू शकते.
अलीकडेच नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले होते की, भारतात मोठ्या विमानांच्या निर्मितीसाठी सरकार तयारी करीत आहे.
>आगामी १५ वर्षांत १०० नवी विमानतळे
एका अधिकाºयाने सांगितले की, आगामी १० ते १५ वर्षांत देशात १०० नवी विमानतळे सुरू करण्यात येतील. यावर ६५ ते ७० बिलियन डॉलरचा खर्च येईल. त्यामुळे विमानांची मागणी वाढेल.

Web Title: Aircraft production in India; Pune and Nagpur are in the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.