विमान प्रवास महागणार!

By Admin | Published: June 2, 2016 02:49 AM2016-06-02T02:49:53+5:302016-06-02T02:49:53+5:30

जेट इंधनाच्या दरात ९.२ टक्के वाढ करण्यात आली त्यामुळे येत्या काळात विमान प्रवासाचे भाडेही महागण्याची चिन्हे आहेत. तेल कंपन्यांनी सांगितले की,

Aircraft travel expensive! | विमान प्रवास महागणार!

विमान प्रवास महागणार!

googlenewsNext

नवी दिल्ली : जेट इंधनाच्या दरात ९.२ टक्के वाढ करण्यात आली त्यामुळे येत्या काळात विमान प्रवासाचे भाडेही महागण्याची चिन्हे आहेत. तेल कंपन्यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील किमती सलग चौथ्या महिन्यात वाढल्या आहेत. दिल्लीत जेट इंधनाचा दर (एटीएफ) ९.२ टक्क्यांनी वाढला. हे इंधन किलोमागे ३,९४५.४७ रुपयांनी वाढले. आता त्याची किंमत ४६,७२९.४८ रुपये किलो झाली आहे. तत्पूर्वी १ मे रोजी जेट इंधनाचा दर १.५ टक्क्याने, तर १९ एप्रिल रोजी ८.७ टक्क्यांनी वाढला होता. स्थानिक विक्रीकर आणि मूल्यवर्धित कर स्वतंत्रपणे द्यावा लागत असल्याने विभिन्न विमानतळांवर दर वेगळवेगळे आहेत. इंधनाच्या दरवाढीचा प्रवासी भाड्यावर काय परिणाम होईल, याबाबत विमान वाहतूक कंपन्यांची कोणतीही प्रतिक्रिया तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सिलिंडरमागे २१ रुपयांनी वाढविली आहे. ग्राहकांना वर्षाला १२ गॅस सिलिंडर अनुदानात मिळतात. हा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागतात.
१४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत २१ रुपयांनी वाढविली आहे. विनाअनुदानित गॅसच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात वाढ केली आहे.विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसची दिल्लीतील किंमत आता ५४८.५० रुपये होईल. ती आधी ५२७.५० रुपये होती. य आधी १ मे रोजी या गॅसच्या दरात प्रति सिलिंडर १८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. अनुदानित गॅसची दिल्लीतील किंमत ४१९.१८ रुपये प्रति सिलिंडर आहे.

Web Title: Aircraft travel expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.