विमान आयात नियम शिथिल करणार

By admin | Published: April 25, 2016 04:17 AM2016-04-25T04:17:11+5:302016-04-25T04:17:11+5:30

देशांतर्गत सेवा पुरविणाऱ्या एअरलाईन्सला आता १८ वर्षे जुन्या झालेल्या विमानांच्या आयातीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

The airline will relax the import rules | विमान आयात नियम शिथिल करणार

विमान आयात नियम शिथिल करणार

Next

नवी दिल्ली : देशांतर्गत सेवा पुरविणाऱ्या एअरलाईन्सला आता १८ वर्षे जुन्या झालेल्या विमानांच्या आयातीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाने क्षेत्रीय हवाई संपर्क वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी याबाबतचे नियम शिथिल करण्याची तयारी दर्शविली आहे.
नियमानुसार स्थानिक विमान कंपन्यांना १५ वर्षांपेक्षा जुन्या विमानांची आयात करण्यास परवानगी नाही. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत हवाई संपर्काला प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने डीजीसीएने दोन दशकांपेक्षा अधिक जुने नियम शिथिल करण्याची तयारी दर्शविली आहे. सरकार लवकरच नवीन उड्डयन धोरणाला अंतिम स्वरूप देणार आहे. त्यात क्षेत्रिय हवाई संपर्कावर भर दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर डीजीसीए नियम शिथिल करीत आहे. आयात केले जाणारे प्रेशराईज्ड विमाने १८ वर्षांपेक्षा कमी वयोमानाची असावीत किंवा त्यांनी निश्चित उड्डाणापेक्षा ५० टक्के उड्डाणेच केली असावी, असा नवा प्रस्ताव आहे.

Web Title: The airline will relax the import rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.