विमान कंपनीची माणुसकी!

By admin | Published: April 20, 2017 12:23 AM2017-04-20T00:23:51+5:302017-04-20T00:23:51+5:30

विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानातून उतरवले किंवा वर सामान ठेवण्याच्या जागेतून विंचू अंगावर पडणे अशा बातम्या वा अनुभव तुम्हाला आले

The airline's humanity! | विमान कंपनीची माणुसकी!

विमान कंपनीची माणुसकी!

Next

नवी दिल्ली : विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानातून उतरवले किंवा वर सामान ठेवण्याच्या जागेतून विंचू अंगावर पडणे अशा बातम्या वा अनुभव तुम्हाला आले असतील, परंतु या ताज्या बातमीमुळे विमान कंपन्यांबद्दलचे तुमचे मत चांगल्या अर्थाने बदलेल.
एतिहाद विमान कंपनीने वयोवृद्ध जोडप्याला त्यांच्या मरणाच्या दारात असलेल्या नातवाची भेट घेता यावी, यासाठी पायलटने विमानाची दिशाच बदलली. मँचेस्टर विमानतळावर ही घटना घडली. एतिहाद कंपनीचे हे विमान होते. विमान धावपट्टीवर धावत असताना जोडप्याने मोबाइल फोन स्वीचड् आॅफ करण्यापूर्वी त्यांच्या जावयाने पाठवलेला मेसेज वाचला. जोडपे ३० मार्च रोजी अबू धाबीमार्गे आॅस्ट्रेलियाला जात होते. त्यांना समजले की त्यांचा नातू अती दक्षता विभागात असून, आपण तेथे असले पाहिजे, असे त्यांना वाटले अशी माहिती त्यांचा ट्रॅव्हल एजंट बेकी स्टीफनसन यांनी सांगितली. जोडप्याने ही माहिती विमानातील कर्मचाऱ्यांना सांगितली व त्यांनी ती कॅप्टनला. कॅप्टनने प्रवासी जेथून विमानात बसतात त्या प्रवेशद्वारापाशी विमान नेले, असे स्टीफनसन म्हणाले. दरम्यान, विमान कर्मचाऱ्यांनी त्या जोडप्याचे सामान घेऊन त्यांना विमानतळावर जाण्यास मदत केली.पार्किंगमधून त्यांची कार आगमन प्रवेशद्वारापाशी आणण्यात आली म्हणजे ते थेट नातवाला भेटायला ती घेऊन जाऊ शकतील. दुर्दैवाने त्यांच्या नातवाचे दुसऱ्याच दिवशी निधन झाले. जोडपे विमानातून उतरल्यावर विमान रवाना झाले. माझ्या पक्षकाराच्या नातवाचे निधन झाले हे दुर्दैव. परंतु एतिहादने ज्या प्रकारे मदत केली ते उल्लेखनीय आहे, असे स्टीफ सन मदत केली त्याचे कौतकच करावे, असे स्टीफनसन यांनी म्हटले.

Web Title: The airline's humanity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.