कर्ज फेडण्यास विमानांची विक्री

By admin | Published: February 22, 2017 01:00 AM2017-02-22T01:00:34+5:302017-02-22T01:00:34+5:30

कर्जाची परतफेड करण्यासाठी आवश्यक असलेले १,७00 कोटी रुपये उभे करण्यासाठी सरकारी मालकीच्या एअर इंडिया

Airplane sales to pay off debts | कर्ज फेडण्यास विमानांची विक्री

कर्ज फेडण्यास विमानांची विक्री

Next

नवी दिल्ली : कर्जाची परतफेड करण्यासाठी आवश्यक असलेले १,७00 कोटी रुपये उभे करण्यासाठी सरकारी मालकीच्या एअर इंडिया कंपनीने आपल्या ताफ्यातील दोन ड्रिमलाईनर (बोइंग ७८७-८00) विमाने विक्रीला काढली आहे. विशेष म्हणजे विक्रीला काढलेली विमाने खरेदी करण्यासाठीच कंपनीने आधी हे कर्ज घेतलेले होते.
ही विमाने विकल्यानंतर कंपनी ती पुन्हा भाड्याने घेऊन वापरणार अहे. हा भाडेकरार १२ वर्षांचा असेल. तीन वर्षांच्या मुदतवाढीची तरतूद करारात असेल, असे एअर इंडियाने विमानांच्या विक्रीसाठी जारी
केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. यापैकी एक विमान एअर इंडियाला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मिळाले होते. तर दुसरे विमान यंदाच जानेवारीत मिळाले होते.
विका आणि परत भाड्याने घ्या (एसएलबी) या व्यवस्थेनुसार, विक्रेता आपली मालमत्ता विकतो. पण प्रत्यक्षात तिचा ताबा सोडीत नाही. विक्री झालेली मालमत्ता नव्या मालकाकडून पुन्हा दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर वापरावयास घेतो. मालकीशिवाय ही वस्तू त्याला वापरायला मिळते.

Web Title: Airplane sales to pay off debts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.