''बॉडी स्कॅनर'' करणार विमानतळाची सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 07:00 AM2019-10-02T07:00:00+5:302019-10-02T07:00:01+5:30
पुणे विमानतळावर लवकरच चाचणी
- राजानंद मोरे-
पुणे : सुरक्षिततेच्यादृष्टीने अति संवेदनशील असलेल्या पुणेविमानतळावर बॉडी स्कॅनरबसविणार आहे. या स्कॅनरमुळे प्रवाशांची अंतर्बाह्य तपासणी करणे शक्य होणार असून अवैध वस्तुंची ने-आण करण्याला आळा घालता येणार आहे. देशातील चार विमानतळांवर स्कॅनरच लवकरच चाचणी घेणार आहे. त्यामध्ये पुण्याचा समावेश केला आहे. देशात पहिल्यांदाच विमानतळांवर बॉडी स्कॅनर बसविले जात आहेत.
देशामध्ये शंभरहून अधिक मोठी विमानतळे आहेत. त्यामध्ये २८ विमानतळे अतिसंवेदनशील तर ५६ विमानतळे संवेदनशील म्हणून ओळखली जातात. अति संवेदनशील विमानतळांमध्ये पुणे विमानतळाचाही समावेश आहे. ब्युरो ऑफ सिव्हील 'अॅव्हीएशन सेक्युरिटी'ने पहिल्या टप्प्यात या ८४ विमानतळांवर बॉडी स्कॅनर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रायोगिक तत्वावर पुणे, कोलकाता व इतर दोन विमानतळांवर हे स्कॅनर लवकरच बसविणार आहेत. ही प्रक्रिया सुरू असून पुढील काही दिवसांत पुणे विमानतळावर चाचणी सुरू केली जाणार आहे. सध्या पुणे विमानतळावर सुरक्षितेसाठी प्रवाशांची तपासणी करण्यासाठी केवळ मेटल डिटेक्टर आहेत. यामध्ये नॉन मेटॅलिक वस्तु आढळून येत नाही. तसेच स्फोटकेही दिसत नाही. पुणे विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाºया प्रवाशांना सातत्याने पकडण्यात येत आहे. त्यासाठी प्रवाशांकडून विविध क्लुप्त्या लढविल्या जातात.
एखाद्या संशयित प्रवाशाची तपासणी करण्याची सध्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. तपासणीसाठी बराचवेळ जातो. तसेच एखाद्या प्रवाशाची कसून तपासणी करायची झाल्यास त्याची कपडे, बुट, बेल्ट काढावे लागतात. पण बॉडी स्कॅनरमुळे प्रवाशांची संपुर्ण अंतर्बाह्य तपासणी करणे शक्य होणार आहे. त्याने कपडे किंवा शरीरामध्ये लपविलेली वस्तु सहजपणे निदर्शनास पडणार आहे. नॉन मेटॅलिक वस्तुंचा छडा लागणार आहे. पुणे विमानतळ हवाई दलाचे असून नागरी उड्डाणासाठी मान्यता दिली आहे. हवाई दलाच्या प्रमुख विमानतळांपैकी हे एक विमानतळ असल्याने सुरक्षिततेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. बॉडी स्कॅनरमुळे ही सुरक्षितता अधिक कडक होणार आहे.
--
पुण्यासह अन्य तीन विमानतळांवर बॉडी स्कॅनर ची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच हे स्कॅनर बसवून प्रवाशांची तपासणी सुरू केली जाईल. सुरक्षितेत्या दृष्टीने तसेच प्रवाशांची तपासणीला वेग यावा यासाठी बॉडी स्कॅनर बसविला जाणार आहे. देशातील विमानतळांवर पहिल्यांदाच असे स्कॅनर बसविले जाणार आहेत.
- अजय कुमार, संचालक, पुणे विमानतळ अॅ
.........................................................................................................................................................................................................................................