4 जी मध्ये एअरटेल आहे जिओ पेक्षा फास्ट

By admin | Published: October 21, 2016 04:28 PM2016-10-21T16:28:40+5:302016-10-21T20:10:30+5:30

4जी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये एअरटेल सर्वात फास्ट असल्याचे समोर आले आहे. ओल्काच्या स्पीडडस्ट आणि ट्रायच्या मायस्पीड पोर्टलवरील अहवालातून ही माहिती उघड झाली आहे

Airtel is in 4G faster than Xiao | 4 जी मध्ये एअरटेल आहे जिओ पेक्षा फास्ट

4 जी मध्ये एअरटेल आहे जिओ पेक्षा फास्ट

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 21 -  4जी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये एअरटेल सर्वात फास्ट असल्याचे समोर आले आहे. ओल्काच्या स्पीडडस्ट आणि ट्रायच्या मायस्पीड पोर्टलवरील अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. 'ट्राय'च्या मायस्पीड पोर्टलवर प्रकाशित झालेल्या 4जी इंटरनेट स्पीडच्या आलेखामध्ये एअरटेल 4जीवर डाऊनलोडिंगचा वेग सर्वाधिक म्हणजे 11.4 एमबीपीएस एवढा असल्याचे समोर आले आहे.  

ट्रायने इंटरनेट स्पीडची चाचणी घेणारे मायस्पीड हे अॅप हल्लीच सुरू केले आहे. या अॅपवर जाऊन तुम्हाला रिलायन्स जिओचा 4जी इंटरनेच स्पीड तपासायचा असल्यास तुम्हाला ऑपरेटर म्हणून जिओची निवड करून, टेक्नॉलॉजीमध्ये 4जी चा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर 4जी सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांच्या वेगाची तुलना करता येईल. ट्रायच्या अॅपवर येणाऱ्या आकडेवारीनुसार एअरटेल 4जीवरील डाऊनलोडिंगचा वेग सर्वाधिक म्हणजे 11.4 एमबीपीएस एवढा आहे. तर 7.9 एमबीपीएस वेगासह रिलायन्स दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर आयडिया आणि व्होडाफोन यांचा क्रम लागतो. तर 6.2 एमबीपीएस वेगासह रिलायन्स जिओ सर्वात शेवटी पाचव्या क्रमांकावर आहे. 

 
(जि्ओला आणखी आंतरजोडणी पॉईंट देणार)
 
तर डेटा अपलोडिंगसाठी आयडियाचा स्पीड सर्वाधिक म्हणजेच 4.1 एमबीपीएस आहे. तर 4.0 एमबीपीएस वेगासह व्होडाफोन दुसऱ्या क्रमांकावर आहे.  3.7 एमबीपीएस वेगासह एअरटेल तिसऱ्या क्रमांकावर आहे.  रिलायन्स जिओ 2.4 एमबीपीएस वेगासह चौथ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत रिलायन्स पाचव्या स्थानी आहे. 
 
(BSNL पण देणार फ्री व्हॉइस सेवा - 'जिओ'ला देणार टक्कर)
 
जिओच्या देशभरातील ग्राहकांची तुलना केली असता जम्मू आणि काश्मीरमधील ग्राहकांना सर्वाधिक वेगवान सेवा मिळत आहे. येथे जिओचा वेग 11.179 एवढा आहे. तर केरळमधील ग्राहकांना जिओची अतिशय संथ सेवा मिळत आहे. येथे जिओचा वेग 3.740 एवढा आहे. त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीरच्या ग्राहकांना 3.487 एवढा अपलोडिंग स्पीड मिळत आहे, तर जिओच्या केरळमधील ग्राहकांना येथेही निराशेचा सामना करावा लागत असून,  येथे 1.429 एवढा अपलोडिंग स्पीड मिळत आहे.  
 

 

Web Title: Airtel is in 4G faster than Xiao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.