जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देणार 3 महिन्यांसाठी 30 जीबी फ्री डेटा

By admin | Published: April 16, 2017 06:56 PM2017-04-16T18:56:13+5:302017-04-16T18:56:13+5:30

रिलायन्स जिओनं बाजारात उडी घेतल्यापासून त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली आहे.

Airtel will offer 30Gb free data for 3 months to compete with Jeo | जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देणार 3 महिन्यांसाठी 30 जीबी फ्री डेटा

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देणार 3 महिन्यांसाठी 30 जीबी फ्री डेटा

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - रिलायन्स जिओनं बाजारात उडी घेतल्यापासून त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली आहे. ग्राहकांनी कोट्यवधींचा टप्पा पार केल्यानंतर जिओनं मोफत सेवा बंद करून प्राइम मेंबरशिप घेण्याची ऑफर आणली. त्यालाही ग्राहकांनी ब-यापैकी प्रतिसाद दिला. त्यानंतर जिओने समर सरप्राइज ऑफर बंद करून धन धना धन ही ऑफर ग्राहकांसाठी सेवेत आणली. त्याच पार्श्वभूमीवर एअरटेलनं ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी 3 महिन्यांकरिता 4जी स्पीड 30 जीबी फ्री डेटा देणार असल्याची घोषणा केली आहे.

एअरटेल 3 महिन्यांसाठी स्वतःच्या पोस्टपेड ग्राहकांना 4जी स्पीडयुक्त 30 जीबी डेटा मोफत देणार आहे. मात्र ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला एअरटेल अ‍ॅपवर लॉगिन करावं लागणार असून, 30 एप्रिलपर्यंतच तुम्ही ही ऑफर मिळवू शकता. एअरटेल प्रवक्ते म्हणाले, गेल्या महिन्यात 10 जीबी डेटाचा फायदा घेणारे ग्राहकही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. एअरटेलचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी ग्राहकांना एक ईमेलही पाठवला आहे. पुढच्या तीन महिन्यांपर्यंत मोफत डेटाचा लाभ घ्या, ही ऑफर तुमच्या लांब सुट्ट्यीच्या काळातही सुरू राहील, असं गोपाल विठ्ठल यांनी ईमेलमध्ये लिहिलं आहे. यासोबत जे ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग पॅक सक्रिय करू शकले नाहीत, त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

तत्पूर्वी रिलायन्स जिओच्या दोन्ही ऑफर्स एकसमानच असल्यामुळे धन धना धन ही ऑफर बंद करावी, अशी मागणी एअरटेलने ट्रायकडे केली होती. रिलायन्सच्या या ऑफरमुळे टेलिकॉम कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे एअरटेलच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते. टेलिकॉम कंपन्यांची स्थिती अत्यंत दयनीय असल्यानं इतर स्पर्धकांना या प्रमाणे ऑफर देणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले होते. रिलायन्सने जिओ प्राइम मेंबरशिपसोबत दिलेली तीन महिन्यांची दिलेली मोफत सेवा बंद करावी, असा आदेश दिल्यानंतर रिलायन्सने नव्या रूपात पुन्हा जुनीच ऑफर ग्राहकांसाठी सेवेत आणली होती. या नव्या ऑफरचे नाव जिओ धन धना धन आहे. जिओ समर सरप्राइज ऑफरप्रमाणेच सर्व सुविधा या ऑफरमध्ये मिळणार आहेत. जिओच्या नव्या ऑफरद्वारे तुम्हाला तीन महिन्यांसाठी मोफत डेटासोबतच फ्री एसएमएस सेवा, जिओ अ‍ॅप सबस्क्रिप्शन मिळणार आहे

Web Title: Airtel will offer 30Gb free data for 3 months to compete with Jeo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.