एअरटेलचा तो दावा खोटा - जिओ

By admin | Published: March 21, 2017 07:43 PM2017-03-21T19:43:27+5:302017-03-21T19:43:27+5:30

अल्पावधीतच रिलायन्स जिओनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केल्यानंतर इतर कंपनींने धसका घेतला आहे. मात्र पहिल्यांदाच जिओने एअरटेलविरूद्ध तक्रार केलीय.

Airtel's claim is false - Zio | एअरटेलचा तो दावा खोटा - जिओ

एअरटेलचा तो दावा खोटा - जिओ

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - अल्पावधीतच रिलायन्स जिओनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केल्यानंतर इतर कंपनींने धसका घेतला आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या एकत्र येत आहेत, तसेच जिओच्या स्वस्त कॉलिंग आणि डेटा प्लॅनविरोधत प्रतिस्पर्धी कंपन्यांनी तक्रारारीही दाखल केल्या होत्या. मात्र पहिल्यांदाच जिओने एअरटेलविरूद्ध तक्रार केलीय. जिओने तक्रारीत म्हटलं आहे एअरटेलने इंटरनेटचा वेग सर्वाधिक असल्याचा दावा केलाय जो सपशेल खोटा आहे.

एअरटेलने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की 40 दशलक्ष चाचण्यांनंतर ओकलाने एअरटेलचा वेग सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. ओकला एक अ‍ॅप्लिकेशन आहे ज्याच्या मार्फत इंटरनेटचा वेग किती आहे ते तपासता येतं.

जिओने आरोप केलाय की ओकला ही कोणतीही सरकारी संस्था नाहीये ती खाजगी कंपनी आहे आणि हे सगळं एअरटेल आणि ओकलाचं संगनमत आहे. जिओचा आरोप आहे की ओकला ही कंपनी वेग जास्त आहे असं सांगण्यासाठी पैसे घेते. त्यामुळे एअरटेलच्या जाहिरातींवर निर्बंध आणावेत.

Web Title: Airtel's claim is false - Zio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.