जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचं पुढचं पाऊल
By admin | Published: March 23, 2017 08:48 PM2017-03-23T20:48:36+5:302017-03-23T21:13:11+5:30
व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर टेलिकॉम कंपनीत झालेलं हे दुसरं मोठ विलिनीकरण आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने वायरलेस ब्रांडबॉडं कंपनी टिकोनाची शेअर खरेदी केलं आहे. टिकोना कंपनीचे पाच जागावरील मालकी आता एअरटेलकडे असणार आहे. टिकोनाचे पाच जागांवरील डिजीटल सर्कल एअरटेलने 1600 कोटीं रुपयात खरेदी केले आहे. व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर टेलिकॉम कंपनीत झालेलं हे दुसरं मोठ विलिनीकरण आहे. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओच्या वाढत्या ग्राहकांचा धसका घेत इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही अनेक ऑफर दिल्या आहेत. जिओच्या फोर जी सर्विसला टक्कर देण्यासाठी एअरटेलने उचलेलं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे बोललं जात आहे.
भारती एअरटेलने आज टिकोनाशी झालेल्या व्यवहाराबद्दल माहिती दिली. गुजरात, पूर्व, पश्चिम उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील सर्व हक्क एअरटेलेने विकत घेतले आहेत. तर राज्यस्थानमध्ये दोन्ही कंपनी मिळून ग्राहकांना फोर-जी सेवा देणार आहेत. तसेचं पुढील काळात मुंबईत टिकोनाचे सर्कलही एअरल विकत घेणार आहे. याविशी त्यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले.