एअरटेलची 'सरप्राइज ऑफर', 30 जीबीपर्यंत मिळवा मोफत डेटा

By admin | Published: March 14, 2017 02:37 PM2017-03-14T14:37:08+5:302017-03-14T14:45:34+5:30

भारती एअरटेलनं स्वतःच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेल सरप्राइज ऑफर सुरू केली आहे.

Airtel's 'Surprise Offer', get up to 30 GB free data | एअरटेलची 'सरप्राइज ऑफर', 30 जीबीपर्यंत मिळवा मोफत डेटा

एअरटेलची 'सरप्राइज ऑफर', 30 जीबीपर्यंत मिळवा मोफत डेटा

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओच्या वाढत्या ग्राहकांचा धसका घेत इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही बाजारात नव्या ऑफर आणल्या आहेत. भारती एअरटेलनं स्वतःच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेल सरप्राइज ऑफर सुरू केली असून, प्लॅनअंतर्गत ग्राहकाला 30 जीबीचा 4जी इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहे.

माय एअरटेल अ‍ॅपच्या माध्यमातून हा डेटा मिळवता येणार आहे. एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी हा मोफत डेटा माय एअरटेल अ‍ॅपवर उपलब्ध असून, त्यासाठी ग्राहकांना अ‍ॅपमधील claim free data यावर क्लिक करावे लागणार आहे, अशी माहिती इकोनॉमिक्स टाइम्सनं दिली आहे.

एअरटेल हे भारतातील सर्वात जलद नेटवर्क आहे. आमच्या नेटवर्कचा स्पीड जगभरात सर्वात जलद असल्याचा किताब आम्हाला ओकोला या स्पीड टेस्ट कंपनीनं दिला आहे. ग्राहकांशिवाय आमचा आनंद हा अपुरा असून, त्यासाठी आम्ही आमच्या पोस्टपेड ग्राहकांचे आभार मानतो, असं एअरटेलतर्फे पोस्टपेड ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या इमेलमध्ये कंपनीचे सीईओ गोपाल विठ्ठल म्हणाले आहेत.
(एअरटेलची 'सरप्राइज' ऑफर, 13 मार्चपासून इंटरनेट फ्री)
(व्होडाफोनची 4 जी ग्राहकांना बंपर ऑफर)
(एअरटेल धमाका, 145 रूपयांत 14 जीबी 4G आणि कॉल्स फ्री)
(एअरटेल धमाका: 345 रूपयांत 28 जीबी 4G आणि कॉल्स फ्री)
एअरटेलनं याआधीही दोन प्लॅन लाँच केले होते. पहिला 145 रुपयांचा, तर दुसरा 345 रुपयांचा प्लॅन आहे. एअरटेलच्या 145 रुपयांच्या प्लॅनमध्ये एअरटेल कॉलिंग आणि रोमिंगमध्ये इनकमिंग कॉलिंग मोफत आहे. तसेच या प्लॅनमध्ये 2 जीबीचा इंटरनेट डेटाही मिळणार आहे. ज्याची वैधता 28 दिवसांपर्यंत मर्यादित असेल. तर 345 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 जीबी इंटरनेट डेटा मिळणार असून, देशभरात कुठेही मोफत कॉलिंग करता येणार आहे. मात्र या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी 500 एमबीपर्यंत डेटा उपलब्ध असून, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंत 500 एमबीचा अतिरिक्त डेटा देण्यात येणार आहे. याची वैधताही 28 दिवसांची असणार आहे.

Web Title: Airtel's 'Surprise Offer', get up to 30 GB free data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.