'एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये', पाकच्या चहा स्टॉलवर 'अभिनंदन' वर्धमान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 03:53 PM2019-03-13T15:53:08+5:302019-03-13T15:54:24+5:30
पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टॉलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून ट्विटरवर हा फोटो व्हायरल करण्यात आहे.
इस्लामाबाद - विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनीपाकिस्तानामध्ये घुसून वीरपराक्रम करुन दाखवला. त्यांच्या शौर्याचे देशातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. तर, कित्येकजण एखाद्या सेलिब्रिटींच्या चाहत्याप्रमाणे त्यांचे चाहते बनले आहेत. मात्र, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की पाकिस्तानातही त्यांचे चाहते आहेत. कराचीतील एका चहावाल्याने आपल्या चहा कँटींनवर अभिनंदन यांचा फोटो लावला आहे.
पाकस्तानच्या कराचीतील चहावाल्याचा हा फोटो आणि मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झला आहे. त्यामध्ये, उर्दु भाषेत संदेश देऊन अभिनंदन यांच्या शौर्याचं कौतुक केलं आहे. मात्र, त्यासोबतच या चहावाल्याने आपल्या चहाच्या कॅंटींगचेही मार्केटींग केल्याचं दिसून येत आहे. ''एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये'' असा संदेश या चहावाल्याने आपल्या चहाच्या कँटीनवरील फलकात लिहिला आहे. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन आप-आपसातील वाद मिटवून चहाने तोंड गोड करावे, असेच या चहावाल्याने सूचवले आहे.
This Pakistani uncle has got some serious marketing skills. The small roadside tea stall has a banner with the following text: 'Khan's Tea Stall - A tea that makes foes turn into friends' with the image of Indian Air Force pilot #Abhinandan - #IAFpic.twitter.com/ldQVG6brI7
— Wajahat Kazmi (@KazmiWajahat) March 12, 2019
पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टॉलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून ट्विटरवर हा फोटो व्हायरल करण्यात आहे. विशेष म्हणजे या फोटोचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी विंग कमांडर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानी सैनिकांसमवेत चहा पिताना दिसून आले. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यास, भारताने प्रत्युत्तर देताना, विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत अडकले होते. तसेच, ते चालवत असलेले विमान मिग 21 हेही कोसळले होते.
Khan Tea Stall—Special tea that may even turn foe into friend—😎#abhinandanpic.twitter.com/vVRaC6ZTyf
— Rauf Klasra (@KlasraRauf) March 12, 2019