आलेमाव यांना पुन्हा जामीन नाकारला
By admin | Published: August 25, 2015 02:08 AM2015-08-25T02:08:11+5:302015-08-25T02:08:11+5:30
लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीच्या कथित लाचप्रकरणात माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी विशेष न्यायालयात केलेला दुसरा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.
पणजी : लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीच्या कथित लाचप्रकरणात माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी विशेष न्यायालयात केलेला दुसरा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना कोलवाळ तुरुंगातच राहावे लागणार आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे, तर इतर दोन संशयितांनाही जामीन मिळाला आहे.
चर्चिल यांना ५ आॅगस्ट रोजी रात्री अटक करून दुसऱ्या दिवशी जेव्हा रिमांडसाठी न्यायालयात सादर करण्यात आले, तेव्हा त्यांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यास आपली काहीच हरकत नसल्याचे त्यांच्या वकिलाने म्हटले होते. याचा अर्थ काही गोष्टी संशयिताच्या वतीने मान्य केल्याचाही अन्वयार्थ त्यातून निघू शकतो. जामीन रद्द करताना नेमक्या याच वाक्याचा आदेशात न्यायाधीशांनी उल्लेख केला आहे.