अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 11:33 AM2019-01-04T11:33:27+5:302019-01-04T11:41:08+5:30
काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्लीः काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी ट्विट करत राहुल गांधींचे आभार मानले आहेत. 2015च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतल्या सर्व नेत्यांचं सहयोग मिळालं, बिकट परिस्थितीत नेत्यांनी चांगली साथ दिली. तुमच्या सर्वांचे आभार, असंही अजय माकन म्हणाले आहेत.
अजय माकन यांनी गुरुवारी दिल्लीचे प्रभारी पीसी चाको यांच्यासमवेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली होती. अजय माकन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे.
Ajay Maken resigns as Delhi Congress President, thanks Congress workers and Rahul Gandhi for support pic.twitter.com/qGhWJ7hagS
— ANI (@ANI) January 4, 2019
कोण बनणार नवे अध्यक्ष?
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसची एक टीम येत्या काही महिन्यांत दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेईल. दिल्लीचे प्रभारी असलेले पीसी चाको येत्या दोन दिवसांत दिल्लीतल्या काँग्रेसच्या 10 ते 12 वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत, त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शीला दीक्षित, योगानंद शास्त्री आणि जेपी अग्रवाल हे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत आहेत. अजय माकन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. आता काही दिवसांपूर्वीच त्यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आली आहे.