अजय सिंग ते योगी आदित्यनाथ, कसा आहे UPच्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास

By admin | Published: March 19, 2017 12:17 PM2017-03-19T12:17:02+5:302017-03-19T13:30:48+5:30

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत कमालीचे यश मिळविल्यावर 21 व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड भाजपाकडून एकमताने करण्यात आली.

Ajay Singh to Yogi Adityanath, how is the UP Chief Minister's visit | अजय सिंग ते योगी आदित्यनाथ, कसा आहे UPच्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास

अजय सिंग ते योगी आदित्यनाथ, कसा आहे UPच्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत कमालीचे यश मिळविल्यावर भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या 21 व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड भाजपाकडून एकमताने करण्यात आली आहे. आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून परिचित असलेले योगी आदित्यनाथ आज मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील.

उत्तराखंड मधील गढवाल या भागात 5 जून1972 रोजी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव अजय सिंह आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. वयाच्या 26 व्या वर्षी ते लोकसभेवर निवडून गेले होते. 1998 रोजी लोकसभेत सर्वात तरुण खासदार होते. तेव्हापासून ते 2014 पर्यंत ते निवडून आले आहेत.

गढवाल विद्यापीठातून आदित्यनाथ यांनी बीएस्सीची पदवी मिळवली आहे. पदवीनंतर त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली. नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन ते संन्यासी झाले. गुरू अवैद्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ते साधना करत होते. तसेच राजकीय कार्यातही ते रस घेऊ लागले. हिंदू वाहिनी नावाची संस्था उभारुन त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा विस्तार केला. हिंदू वाहिनी म्हणजे हिंदू युवकांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी गट आहे.

योगी आदित्यनाथ नेहमी असं काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत असतात ज्यामुळे नेहमी चर्चेत असतात. योगी आदित्यनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा अनेकदा अडचणीत सापडली असून विरोधकांना भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्ञात आहेत. त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगे पसरवणे, हत्येचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, चिथावणी देणे, धमकी देणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे.

Web Title: Ajay Singh to Yogi Adityanath, how is the UP Chief Minister's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.