बोरसे विद्यालय खो-खो स्पर्धेत सलग पाचव्या वर्षी अजिंक्य
By Admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:39+5:302015-09-07T23:27:39+5:30
निफाड : पंचायत युवा क्रीडा खेलअंतर्गत निफाड तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा क. का. वाघ विद्याभवन, भाऊसाहेब नगर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. मुलींचा अंतिम सामना योगेश्वर विद्यालय, दावचवाडी व कै. तात्यासाहेब बोरस्ते विद्यालय, नांदूरमधमेश्वर यांच्यात झाला नांदूरमधमेश्वर संघाने एकतर्फी विजय संपादन करून सलग पाचव्या वर्षी अजिंक्य होण्याचा बहुमान मिळवला. या संघात अमरीन शेख, पूजा डांगले, सोनाली मोरे, धनश्री डांगले, ऐश्वर्या गयाले, काजल शेळके, सुण्याता सोनवणे, मोनाली घायाळ, श्रद्धा नाईकवाडे, पूजा तुरेकर, गायत्री शिंदे, सपना इल्हे आदि खेळाडूंचा समावेश होता. संघास क्रीडाशिक्षक विलास निरभवणे याचे मार्गदर्शन लाभले.
न फाड : पंचायत युवा क्रीडा खेलअंतर्गत निफाड तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा क. का. वाघ विद्याभवन, भाऊसाहेब नगर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. मुलींचा अंतिम सामना योगेश्वर विद्यालय, दावचवाडी व कै. तात्यासाहेब बोरस्ते विद्यालय, नांदूरमधमेश्वर यांच्यात झाला नांदूरमधमेश्वर संघाने एकतर्फी विजय संपादन करून सलग पाचव्या वर्षी अजिंक्य होण्याचा बहुमान मिळवला. या संघात अमरीन शेख, पूजा डांगले, सोनाली मोरे, धनश्री डांगले, ऐश्वर्या गयाले, काजल शेळके, सुण्याता सोनवणे, मोनाली घायाळ, श्रद्धा नाईकवाडे, पूजा तुरेकर, गायत्री शिंदे, सपना इल्हे आदि खेळाडूंचा समावेश होता. संघास क्रीडाशिक्षक विलास निरभवणे याचे मार्गदर्शन लाभले.संघाच्या यशाबद्दल मुख्याध्यापक के.आर. बैरागी, व्ही. टी. राऊत, एस. एस. गोसावी, व्ही. एस. गोसावी, बी. एम. सांगळे, नवले आर. टी., थोरात आर. के., कोकणी एस. एस., गोरडे एम. जी., जाधव पी. व्ही. श्रीमती आवारे, श्रीमती गीते, एस. आर. तासकर, एम. सी. सूर्यवंशी, कोळी, वाघ, साळवे, शिंदे, बर्वे, घोटेकर व समस्त ग्रामस्थ यांनी खेळाडूंचे कौतुक केले.फोटो-निफाड तालुकास्तरीय पायका खो-खो स्पर्धेतील तात्यासाहेब बोरस्ते विद्यालय मुलींच्या विजयी संघ. समवेत मुख्याध्यापक के. आर. बैरागी, एस. एस. गोसावी, बी. एम., सांगळे, थोरात, नवले, गोसावी, क्रीडाशिक्षक विलास निरभवणे आदि.