अजित डोवाल यांच्याकडून काश्मिरात हवाई पाहणी'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:55 AM2019-08-13T03:55:10+5:302019-08-13T03:55:27+5:30
काश्मीरमध्ये सर्वत्र बकरी ईद साजरी केली जात असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची सोमवारी हवाई पाहणी केली.
श्रीनगर : काश्मीरमध्ये सर्वत्र बकरी ईद साजरी केली जात असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची सोमवारी हवाई पाहणी केली.
३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये संचारबंदीसह अन्य निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंह व लष्करी अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे काश्मीरच्या विविध भागांतील सुरक्षा व्यवस्थेची हवाई पाहणी केली. काश्मीरमधील स्थिती संपूर्ण नियंत्रणाखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहशतवादी हिंसाचार घडविण्याची भीती असल्याने मोठ्या स्वरुपाचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास सध्या परवानगी नाकारण्यात आली आहे. बकरी ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीचे तुरळक प्रकार सोमवारी घडले. (वृत्तसंस्था)