पावणेनऊ कोटी वळवले विकास कसा होणार अजित पवारांची टीका : सतीश पाटलांनी मारला विनोद देशमुखांना टोला...

By admin | Published: March 27, 2016 12:45 AM2016-03-27T00:45:39+5:302016-03-27T00:45:39+5:30

जळगाव : शहर विकासाच्या निधीचे महापालिकेचे पावणे नऊ कोटी महसूल विभागाने काही महसुली कर वसुलीसाठी परस्पर वळविला. मग महापालिकेने शहराचा विकास कसा करायचा..असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित मेळाव्यात केला.

Ajit Pawar's criticism of the development of the Pavnayanu crores: Satish patel defeated Vinod Deshmukh ... | पावणेनऊ कोटी वळवले विकास कसा होणार अजित पवारांची टीका : सतीश पाटलांनी मारला विनोद देशमुखांना टोला...

पावणेनऊ कोटी वळवले विकास कसा होणार अजित पवारांची टीका : सतीश पाटलांनी मारला विनोद देशमुखांना टोला...

Next
गाव : शहर विकासाच्या निधीचे महापालिकेचे पावणे नऊ कोटी महसूल विभागाने काही महसुली कर वसुलीसाठी परस्पर वळविला. मग महापालिकेने शहराचा विकास कसा करायचा..असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित मेळाव्यात केला.
राष्ट्रवादी कॉँग्रेस ग्रामीण व महानगरतर्फे प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. मेळाव्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात पवार यांनी केंद्र व राज्य सरकाच्या धोरणांवर कडाडून टिका केली.
मोदींनी निराश केले
आपल्या भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले, १९८४ नंतर प्रथमच देशात बहुमताने जनतेने भाजपाला निवडून दिले. मोंदींनी जनतेला स्वप्न दाखविली. त्यातून एक लाट निर्माण झाली पण ती लाट कधीही कायम नसते. चढ उतार हे राजकीय जीवनात असतातच. सत्ता नाही म्हणून आपले नेते शरद पवार कधी निराश झाले नाहीत. सर्वसामांन्यांशी बांधलकी ठेवून त्यांनी पक्ष वाढविला.
राज्यात जलसंधारणाची कामे किती झाली, नदी जोड अंतर्गत कामे झालीत का?, मागेल त्याला शेततळी म्हणतात आम्ही शेततळ्यांना ८० हजार देत होतो हे ५० हजार देत आहेत. राजीव गांधी आरोग्यदायी योजना बाजुला ठेवली, केवळ योजनांची नावे बदलविण्याचे काम हे सरकार करत आहे.
आर.आर. पाटलांचे स्मरण
आर.आर.पाटील स्वच्छ प्रतिमेचे म्हणून विविध पदांवर त्यांना पक्ष प्रमुख शरद पवार यांनी संधी दिली. डान्सबारवर आम्ही बंदी आणली. आता ते सुरू झाले हे घ्या अच्छे दिन. कोर्टात योग्य माहिती सादर केली असती तर ही वेळ आली नसती. डाळींचे भाव कडाडले, तुरडाळ २०० रुपये भावाने मिळत आहे, केवळ महागाई वाढ या काळात झाली हा या सरकाचा नाकर्तेपणाच आहे.
भ्रष्टाचारांची मालिका
या राज्यात डीग्री घोटाळा झाला, महापुरुषांचा १६ रुपयांचा फोटो १६०० रुपयात करण्यातही घोटाळा झाला, आदिवासी निधीत गडबडी, चिक्कीचा करोडांचा घोटाळा झाला हे जनतेसमोर आणा. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत या सरकारचा खरा चेहेरा जनतेसमोर आणा.

Web Title: Ajit Pawar's criticism of the development of the Pavnayanu crores: Satish patel defeated Vinod Deshmukh ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.