कृत्रिम बुद्धिमत्ता स्पर्धेत आकाश त्रिपाठी देशात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 05:05 AM2019-11-13T05:05:06+5:302019-11-13T05:05:14+5:30
आकाश कमलेश त्रिपाठी या विद्यार्थ्याने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.
चेन्नई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) घेतलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय) स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आकाश कमलेश त्रिपाठी या विद्यार्थ्याने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रथमच घेतलेल्या अशा प्रकारच्या या स्पर्धेत देशभरातील १,००० महाविद्यालयांतील ३०,००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
विद्यार्थ्यांच्या अचाट कल्पकतेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व त्यांनी स्वत: प्रयोगशील व्हावे, यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. यातील स्पर्धकांना तीन प्रकारच्या आॅनलाईन क्विज, दररोजच्या जीवनात येणाऱ्या समस्या एआयच्या माध्यमातून सोडविण्याचे कौशल्य, सादरीकरण यातून जावे लागले व मगच त्यांची अंतिम फेरीत निवड झाली. यात औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आकाश कमलेश त्रिपाठी याने देशात प्रथम क्रमांक पटकावला. नवसारी येथील स्नेह आर. मेहता दुसºया, तर आयआयटी जोधपूरमधील हर्षित शर्मा तिसºया क्रमांकावर राहिला. अंतिम फेरीत २० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना टीसीएसमध्ये संधी देण्याची तयारी दर्शविली आहे. अंतिम समारंभात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मिलस्वामी अण्णादुराई यांची उपस्थिती होती.