अकबर महान मग महाराणा प्रताप का नाही - राजनाथ सिंह
By admin | Published: May 18, 2015 10:18 AM2015-05-18T10:18:13+5:302015-05-18T11:06:06+5:30
महाराणा प्रताप महान का नाही, मेवाडमधील त्यांचा पराक्रम व बलिदानासाठी त्यांचाही सन्मान केला पाहिजे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
प्रतापगड, दि. १८ - इतिहासकार अकबर महान होते असे म्हणतात, आम्हाला यावर काहीच आक्षेप नाही, पण मग महाराणा प्रताप महान का नाही, मेवाडमधील त्यांचा पराक्रम व बलिदानासाठी त्यांचाही सन्मान केला पाहिजे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
हिंदू योद्धा व महापुरुषांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण असून रविवारी राजस्थानमधील एका कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संघाचीच रि ओढली. प्रतापगड येथे महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे अनावरण केल्यावर राजनाथ सिंह म्हणाले, महाराणा प्रताप महान आहेत हे माझे वैयक्तीक मत आहे. पण आता यासंदर्भात ऐतिहासिक संदर्भ पुढे येण्याची गरज आहे. पुढील पिढीसमोर महाराणा प्रताप हे एक थोर व महान योद्धा होते हे दाखवले पाहिजे. महाराणा प्रताप यांच्या बलिदानामुळे देशाला प्रेरणा मिळू शकेल असेही त्यांनी नमूद केले.